Gaurav More ची 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'तून एक्झिट, शेअर केली भावनिक पोस्ट!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Gaurav More : Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या लोकप्रिय शोमधून गौरव मोरे (Gaurav More) त्याच्या विनोदी अभिनय कौशल्याने सर्वांचाच लाडका बनला. त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.  फिल्टर पाड्याचा बच्चन या नावाने तो घराघरात पोहोचला. पण आता त्याची चर्चा एका वेगळ्याच कारणाने होत आहे. गौरवने एक मोठा निर्णय घेतला आहे ज्याबद्दलची पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. (Gaurav More's exit from the Maharashtrachi Hasyajatra shared an emotional post on Instagram)

गौरव मोरेने ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’तून एक्झिट घेत असल्याचं सांगितलं आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. हास्यजत्रेच्या सेटचा व्हिडीओ पोस्ट करत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत नाराजी दर्शवली.

हेही वाचा : Maharashtra Lok Sabha : मोदींची शरद पवारांबद्दल भाषा अचानक का बदलली?

गौरवला खरी ओळख ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने मिळाली. पण आता त्याने हा शो सोडला आहे. आता तो सोनी हिंदीवरील 'मॅडनेस मचाएंगे' या कॉमेडी शोमध्ये दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच ही भावनिक पोस्ट शेअर करून त्याने चाहत्यांना याबाबत माहिती दिली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गौरव मोरेच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

'आरा बाप मारतो का काय मी… ये बच्ची… रसिक प्रेक्षक आपण या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं सन्मान दिला त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत. मला सांगताना खूप वाईट वाटतंय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच “महाराष्ट्राची हास्य जत्रा”मधून आपला निरोप घेत आहे.'

हेही वाचा : केजरीवाल ऐन प्रचारादरम्यान तुरुंगातून येणार बाहेर.. जामीन मंजूर!

पुढे गौरवने लिहिलं, 'माझ्या कामातून कोणच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो. महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो माध्यम सारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील! असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शो साठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असच राहू दे.'

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT