Maharashtra Lok Sabha : मोदींची शरद पवारांबद्दल भाषा अचानक का बदलली?
PM Modi on Sharad Pawar And Uddhav Thackeray : पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना एनडीएमध्ये या असं का म्हणावं लागत आहे?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पंतप्रधान मोदींची पवार-ठाकरेंना ऑफर

पंतप्रधान मोदींचा प्रचारातील सूर का बदलला?

लोकसभा निवडणूक महाराष्ट्र २०२४
PM Modi Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुरूवारी नंदुरबारमध्ये सभा झाली. या सभेत मोदींनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पवारांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यानंतर ‘काँग्रेससोबत मरण्यापेक्षा एनडीएसोबत या तुमचे स्वप्न पूर्ण होतील’ असं वक्तव्य मोदींनी केलं. पुण्यातल्या सभेत पवारांना भटकती आत्मा म्हणणाऱ्या मोदींनी आता थेट त्यांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यानंतर मोदींची भाषा का बदलली आहे, हेच समजावून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची नंदुरबारमध्ये सभा पार पडली. यावेळी बोलताना मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली. सुरुवातीला नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना म्हणत डिवचलं आणि त्यानंतर त्यांना थेट सोबत येण्याची ऑफर दिली. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पवारांना ‘भटकती आत्मा’ म्हणणारे; त्याचबरोबर एकच दिवस आधी ठाकरेंना ‘नकली संतान’ म्हणणाऱ्या मोदींनी पवार – ठाकरेंना थेट सोबत येण्याची ऑफर का दिली? अशी चर्चा आता झाल्या आहेत.
ठाकरेंबद्दल सहानुभूती, पवारांना भटकती आत्मा
महाराष्ट्रातील निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये मोदींची प्रचारातील विधानं कशी बदलत गेली ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील सभांच्या प्रचारांमध्ये मोदी यांनी ‘खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी’ आमच्यासोबत आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भाषणांमधून त्यांनी त्याचा वारंवार उल्लेख केला.
हेही वाचा >> "काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा...", मोदींची पवार-ठाकरेंना 'ऑफर'
तिसऱ्या टप्प्यामध्ये मोदींनी थेट पवार आणि ठाकरेंवर हल्ला करण्यास सुरुवात केली. पुण्यातील सभेत मोदींनी पवारांना थेट ‘भटकती आत्मा’ म्हटलं, त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. याच टप्पात पवारांनी कृषीमंत्री असताना महाराष्ट्रासाठी काही केलं नाही असं देखील सांगण्याचा प्रयत्न मोदींनी केला. त्याचबरोबर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ठाकरेंना सहानभूती दाखवण्याचा प्रयत्न देखील मोदींनी केला.