Arvind Kejriwal Bail: अरविंद केजरीवाल ऐन प्रचारादरम्यान तुरुंगातून येणार बाहेर.. जामीन मंजूर!
Arvind Kejriwal Bail Hearing Updates: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर सर्वोच्च न्यायालयाने आज (10 मे) आदेश दिला असून त्यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
ADVERTISEMENT

Arvind Kejriwal Bail and Lok Sabha Election 2024: नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) प्रचारादरम्यान आपल्या जामिनाची वाट पाहत असलेले मुख्यमंत्री केजरीवाल यांना दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे.. केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर सर्वोच्च न्यायालयाने आज आपला आदेश दिला असून त्यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ऐन प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल हे तुरुंगातून बाहेर येणार आहेत. त्याच वेळी, ईडीने अंतरिम जामिनाला जोरदार विरोध केला तसेच पुरवणी आरोपपत्रही दाखल केले. याच्या जोरावर ईडीने केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला कोंडीत पकडण्याची संपूर्ण योजना तयार केली होती. ईडी केजरीवाल यांना दारू घोटाळ्यातील मुख्य आरोपी असल्याचं म्हणत आहे.
अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मिळाला आहे. आज केवळ पाच मिनिटे सुनावणी झाली आणि प्रतिज्ञापत्रावर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला. केजरीवाल यांच्या निवडणूक प्रचारावर कोणतेही बंधन नाही. मात्र त्यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करावे लागणार आहे.
तिहारशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाचा आदेश ट्रायल कोर्टात जाईल. त्यानंतर ट्रायल कोर्टात जामीन बॉण्ड भरला जाईल, त्यानंतर ट्रायल कोर्ट रिलीझ ऑर्डर तयार करेल आणि तिहार जेल प्रशासनाकडे पाठवेल. ट्रायल कोर्टाच्या सुटकेचा आदेश मिळाल्यानंतरच तुरुंग प्रशासन अरविंद केजरीवाल यांची सुटका करेल.
हे ही वाचा>> "...त्यामुळे ते अस्वस्थ आहेत", मोदींच्या 'ऑफर'वर पवारांचं विधान
तत्पूर्वी, सूत्रांच्या हवाल्याने असे वृत्त आले होते की, उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात ईडी आज दिल्ली दारू घोटाळ्याच्या ट्रायल कोर्टात आरोपपत्र दाखल करण्याची तयारी करत आहे. सूत्रांनी सांगितले की, या आरोपपत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुख्य सूत्रधार म्हणून वर्णन करण्यात आलं आहे. यासोबतच 'आप'लाही आरोपी करण्यात आले आहे.