Sharad Pawar : "...त्यामुळे ते अस्वस्थ आहेत", मोदींच्या 'ऑफर'वर पवारांचं विधान!
Sharad Pawar on PM Modi : मोदींचा जो विचार आहे, त्या विचाराविरुद्ध जनमत व्यक्त होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत, असे पवार म्हणाले!
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लोकसभा निवडणूक महाराष्ट्र २०२४

शरद पवार यांचे मोदींना उत्तर
Sharad Pawar on Narendra Modi Offer : काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत या आणि सन्मानाने स्वप्न पूर्ण करा, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एनडीए सामील होण्याची ऑफर दिली. त्यांच्या या ऑफरवर शरद पवारांनी सविस्तर भूमिका मांडली. तेच या विधानामागील कारणाबद्दलही भाष्य केले.
पुण्यात शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी मोदींनी दिलेल्या ऑफरवर पवार यांनी सविस्तर भूमिका मांडली.
पवार म्हणाले, "आज या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती ही मोदींमुळे संकटात आली आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल किंवा झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची भूमिका घेतली. याच्या पाठिमागे केंद्रीय नेतृत्वाचा, केंद्र सरकारचा सहभाग असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, लोकशाही पद्धतीवर कोणाचा कितपत विश्वास आहे."
हेही वाचा >> "काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा...", मोदींची पवार-ठाकरेंना 'ऑफर'
"ज्या व्यक्तीचा, ज्या पक्षाचा, ज्या विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास नाही, असा समज लोकांचा पक्का झाला असेल, त्यांच्याबरोबर असोसिएशन माझ्याकडून वैयक्तिक सोडा, तर राजकीय हे माझ्याकडून कधीही होणार नाही", अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.