भर लग्न मंडपात नवरदेव दारु पिऊन बसला, नवरीला लाथ घातली, सासऱ्याचाही मोठा राडा, 3 जण गंभीर जखमी

मुंबई तक

Crime News : मिळालेल्या माहितीनुसार बहराइच जिल्ह्यातील मुराइनपुरवा येथून विशाल नावाच्या तरुणाची वरात गणेशपूर येथे आली होती. सुरुवातीला सर्व काही उत्साहात सुरू होते. मात्र रात्री 11 च्या सुमारास जेव्हा जयमाला विधीसाठी नवरदेव विशाल स्टेजवर चढला तेव्हा तो नशेमुळे स्वतःवरचे नियंत्रण गमावून बसला होता. हार घालताना अचानक त्याने नवरीला निशा लाथ मारली. हे पाहून उपस्थित पाहुणे आणि वधूपक्षाचे लोक अवाक झाले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भर लग्न मंडपात नवरदेव दारु पिऊन बसला, नवरीला लाथ घातली

point

सासऱ्याचाही मोठा राडा, 3 जण गंभीर जखमी

Crime News : उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातून लग्नातील एका विचित्र आणि संतापजनक घटनेचा प्रकार समोर आला आहे. रामनगर तहसीलच्या गणेशपूर गावात शुक्रवारी रात्री जयमालेच्या वेळी नवरदेवाने दारूच्या नशेत मर्यादा ओलांडली. नशेत असलेल्या नवरदेवाने चक्क स्टेजवरच नवरीला लाथ मारली आणि मध्यस्थी करायला आलेल्या सासऱ्यालाही मारहाण केली. या प्रकारानंतर लग्नमंडपाचे रूपांतर युद्धभूमीत झाले.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार बहराइच जिल्ह्यातील मुराइनपुरवा येथून विशाल नावाच्या तरुणाची वरात गणेशपूर येथे आली होती. सुरुवातीला सर्व काही उत्साहात सुरू होते. मात्र रात्री 11 च्या सुमारास जेव्हा जयमाला विधीसाठी नवरदेव विशाल स्टेजवर चढला तेव्हा तो नशेमुळे स्वतःवरचे नियंत्रण गमावून बसला होता. हार घालताना अचानक त्याने नवरीला निशा लाथ मारली. हे पाहून उपस्थित पाहुणे आणि वधूपक्षाचे लोक अवाक झाले.

सासर्‍याला मारहाण आणि खुर्च्यांची तोडफोड

हे वाचलं का?

    follow whatsapp