तरुणीची हत्या केली, मग तिच्या मृतदेहावर बसून दारु प्यायली; एमबीएच्या विद्यार्थिनीसोबत काय घडलं?

मुंबई तक

Crime News : आपला समाज अधिकाधिक हिंसक होत चालला आहे याची साक्ष देणाऱ्या अनेक घटना दररोज घडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रियकराने प्रेयसीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहावर बसून तो दारु प्यायली. धक्कादायक म्हणजे प्रेयसीची बदनामी व्हावी या उद्देशाने तिच्याच मोबाईलवरुन तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हॉट्स अॅप ग्रुप्सवर शेअर केले. पीयूष असं या आरोपीचं नाव आहे. या संतापजनक प्रकारानंतर आरोपीच्या वडिलांनीही कठोर शिक्षेची मागणी केली आहे. मृत तरुणी ही एमबीएचे शिक्षण घेत होती.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तरुणीची हत्या केली, मग तिच्या मृतदेहावर बसून दारु प्यायली

point

एमबीएच्या विद्यार्थिनीसोबत काय घडलं?

Crime News : आपला समाज अधिकाधिक हिंसक होत चालला आहे याची साक्ष देणाऱ्या अनेक घटना दररोज घडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रियकराने प्रेयसीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहावर बसून तो दारु प्यायली. धक्कादायक म्हणजे प्रेयसीची बदनामी व्हावी या उद्देशाने तिच्याच मोबाईलवरुन तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हॉट्स अॅप ग्रुप्सवर शेअर केले. पीयूष असं या आरोपीचं नाव आहे. या संतापजनक प्रकारानंतर आरोपीच्या वडिलांनीही कठोर शिक्षेची मागणी केली आहे. मृत तरुणी ही एमबीएचे शिक्षण घेत होती. मध्य प्रदेशातील इंदोरमधील ही घटना आहे.

हे ही वाचा : पंढरपूर : सासूला मारण्यासाठी सुनेनं पाण्यात मिसळलं विष, पण नवऱ्याचाच गेला बळी... कसा फसला महिलेचा डाव?

'असा' झाला हत्याकांडाचा उलगडा

10 फेब्रुवारी रोजी पीयूषने विद्यार्थिनीला आपल्या भाड्याच्या खोलीवर बोलावले होते. तिथे त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने तिची हत्या केली. हत्येनंतर त्याने तिच्याच मोबाईलवरून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केले. या क्रूर कृत्यानंतर आरोपी ट्रेनने महाराष्ट्रातील पनवेल आणि त्यानंतर मुंबईला पळून गेला होता. 13 फेब्रुवारी रोजी खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर या भीषण हत्याकांडाचा खुलासा झाला.

संशयातून हत्या

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, पीडित तरुणीचे दुसऱ्या कोणाशी तरी संबंध असल्याचा संशय पीयूषला होता. याच संशयातून त्याने हे कृत्य केले. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाचे 'सीन रिक्रिएशन' करण्यात आले असून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले आहेत. सध्या पोस्ट मार्टम अहवालाची प्रतीक्षा असून, त्यानंतर या प्रकरणात आणखी काही धक्कादायक तथ्ये समोर येण्याची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणात लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp