मुंबई: विक्रोळी पंप हाऊसच्या गेटवरून उडी मारताना मद्यधुंद तरुणाच्या हातात रॉड घुसला, मध्यरात्री उडाला गोंधळ

मुंबई तक

Mumbai News : मुंबईतील विक्रोळीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बीएमसी पंप हाऊसच्या गेटवरून एक तरुण उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. उडी मारताना तरुणाचा हात एका धारधार लोखंडी रॉडमध्ये अडकल्याची माहिती समोर आली. ही घटना इतकी गंभीर होती की, रॉड त्याच्या हातात घुसला आणि हाताला गंभीर जखम झाली.

ADVERTISEMENT

Mumbai news
Mumbai news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पंप हाऊसच्या गेटवरून उडी मारताना तरुणाच्या हातात रॉड घुसला

point

25 ते 30 मिनिटांच्या परिश्रमानंतर रॉड कापला

Mumbai News : मुंबईतील विक्रोळीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बीएमसी पंप हाऊसच्या गेटवरून एक तरुण उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. उडी मारताना तरुणाचा हात एका धारधार लोखंडी रॉडमध्ये अडकल्याची माहिती समोर आली. ही घटना इतकी गंभीर होती की, रॉड त्याच्या हातात घुसला आणि हाताला गंभीर जखम झाली. ही घटना शनिवारी पहाटे 2:30 ते 3:00 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे वृत्त आहे. 

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर : खाकीचं स्वप्न धुळीला! पोलीस भरतीदरम्यान धावताना सांगलीच्या 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू...

पंप हाऊसच्या गेटवरून उडी मारताना तरुणाच्या हातात रॉड घुसला

औषध घेण्यासाठी निघालेल्या एका प्रत्यक्षदर्शीने पंप हाऊसच्या आतून आरडाओरड ऐकली. घटनास्थळी लोकांनी धाव घेतली असता, त्यांना आतिश शेवाळे (वय 30) हा मुलगा घटनास्थळी दिसला होता. त्याच्या हातात जाड लोखंडी रॉड अडकून बसलेला होता. आतिशला गंभीर दुखापत झाल्याने त्याला अधिक दुखू लागले आणि त्यांची प्रकृती देखील बिघडू लागली होती. 

25 ते 30 मिनिटांच्या परिश्रमानंतर रॉड कापला

स्थानिकांनी तातडीने मदत केली आणि घटनास्थळी ग्राइंडरची व्यवस्था देखील केली होती. सुमारे 25 ते 30 मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर, गेटचा घुसलेला काही भाग कापण्यात आला होता. प्राथमिक उपचारानंतर, तरुणाला रुग्णालयातून सोडण्यात आले आणि पोलिसांनी या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल केला नाही. 

तरुण जरी मद्यधुंद असला तरी, या घटनेनं प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आतिश हा पंप हाऊसमध्ये का जात होता? बीएमसी पंप हाऊससारख्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी नव्हता का? 

हे वाचलं का?

    follow whatsapp