छत्रपती संभाजीनगर : खाकीचं स्वप्न धुळीला! पोलीस भरतीदरम्यान धावताना सांगलीच्या 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू...
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीच्या ग्राउंडसाठी धावत असताना सांगलीच्या एका 14 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. 1600 मीटर फेरीत धावत असताना तरुण अचानक जमिनीवर कोसळला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पोलीस भरतीदरम्यान धावताना सांगलीच्या 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू...
छत्रपती संभाजीनगरमधील दुर्दैवी घटना
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीच्या प्रक्रियेदरम्यान अतिशय दु:खद आणि धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. पोलीस भरतीच्या ग्राउंडमध्ये धावत असताना सांगलीच्या एका 14 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. वृत्तानुसार, 1600 मीटर फेरीत धावत असताना तरुण अचानक जमिनीवर कोसळला. त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर, भरतीच्या मैदानात उपस्थित असलेल्या तरुणांमध्ये शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळच्या सुमारास ही वेदनादायी घटना घडली. ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत लोहमार्ग पोलीस भरतीसाठी (SP Office) येथील मैदानावर उमेदवारांसाठी 1600 मीटरची धाव आयोजित करण्यात आली होती आणि मोठ्या संख्येने तरुण पोलीस भरतीच्या ग्राउंडसाठी उपस्थित होते. यामध्ये सांगली जिल्ह्यातील पलूसचा संग्राम शिंदे नावाचा तरुण देखील सहभागी झाला होता. संग्राम बऱ्याच वर्षांपासू पोलिसात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता आणि यावर्षीच्या भरतीसाठी तो अगदी उत्साही होता, असं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: बीड: पतीला दारूचं व्यसन अन् सासू-सासऱ्यांचे टोमणे... अंबाजोगाईत विवाहितेनं संपवलं आयुष्य! तिघांवर गुन्हा दाखल
1600 मीटर धावताना अचानक कोसळला अन्...
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, धावताना शेवटच्या टप्प्यात अंतिम रेषेच्या अगदी जवळ पोहोचला असताना संग्राम अचानक जमिनीवर कोसळला. घटनास्थळी उपस्थित असलेले अधिकारी आणि इतर उमेदवार तातडीने त्याच्या मदतीला धावले आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, डॉक्टरांच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतर सुद्धा त्याचा जीव वाचू शकला नाही. रुग्णालयात उपचारादरम्यान संग्रामचा मृत्यू झाला.
हे ही वाचा: आधी भाजप आमदार, आता राष्ट्रवादी मंत्र्यांसोबतचे फोटो व्हायरल; भिगवण कथित अपहरण प्रकरणाला राजकीय वळण
छत्रपती संभाजीनगर शहरातील या भरतीअंतर्गत, एकूण 93 कॉन्स्टेबलची पदे भरली जाणार असून या शर्यतीत सहभागी होण्यासाठी 600 हून अधिक उमेदवार मैदानात दाखल झाले होते. सध्या, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासानुसार, अदिक शारीरिक दबावामुळे किंवा आरोग्याशी संबंधित कारणांमुळे तरुणाची प्रकृती बिघडली असावी. आता चौकशी अहवालानंतरच अधिकृत पुष्टी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.










