सॅनिटायझर ओतून गर्लफ्रेंडच्या गुप्तांगाला लावली आग, बॉयफ्रेंडचं सैतानी कृत्य; नेमकं कारण काय?
Crime News : एका 19 वर्षीय तरुणीवर तिच्या लिव्ह-इन पार्टनरने अमानुष अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मूळ त्रिपुराची रहिवासी असलेल्या या तरुणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी शिवम याने तिला बेदम मारहाण केली. शिमने तरुणीच्या गुप्तांगावर सॅनिटायझर ओतून आग लावली. सध्या पीडितेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सॅनिटायझर ओतून गर्लफ्रेंडच्या गुप्तांगाला लावली आग
बॉयफ्रेंडचं सैतानी कृत्य
नेमकं कारण काय?
Crime News : एका 19 वर्षीय तरुणीवर तिच्या लिव्ह-इन पार्टनरने अमानुष अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मूळ त्रिपुराची रहिवासी असलेल्या या तरुणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी शिवम याने तिला बेदम मारहाण केली. शिमने तरुणीच्या गुप्तांगावर सॅनिटायझर ओतून आग लावली. सध्या पीडितेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. हरियाणातील गुरुग्राम येथील ही घटना आहे.
हे ही वाचा : 'हसू झालंय माझं..,जीव होता तो माझा..', सोलापुरातल्या पायलची काळजाचं पाणी करणारी सुसाईड नोट; तिघांना अटक
चारित्र्यावर संशय घेत मारहाण
पीडित तरुणी गुरुग्राममध्ये राहून बीएससी बायोटेकचे शिक्षण घेत होती. सप्टेंबर 2025 मध्ये एका ऑनलाईन डेटिंग ॲपच्या माध्यमातून तिची ओळख दिल्लीच्या नरेला येथील रहिवासी असलेल्या शिवमशी झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर दोघेही गुरुग्राममध्ये एकत्र राहू लागले. मात्र, काही काळातच शिवम तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला आणि किरकोळ कारणावरून तिला मारहाण करू लागला.
सॅनिटायझर ओतून आग लावली
16 फेब्रुवारी रोजी आरोपीने क्रूरतेचा कळस गाठला. त्याने पीडितेला इतकी अमानुष मारहाण केली की तिची प्रकृती खालावली. पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, शिवमने तिच्या डोक्यात स्टीलची बाटली मारली, तिचे डोके भिंतीवर आणि कपाटावर आदळले. इतकेच नाही तर मातीच्या भांड्यानेही तिच्यावर वार केले. त्यानंतर त्याने तिच्या खाजगी भागावर सॅनिटायझर ओतून आग लावून दिली. या वेदनादायक प्रकारानंतर पीडितेने आपल्या आईला फोन करून वाचवण्याची विनंती केली, तेव्हा हे भीषण वास्तव उघड झाले.










