सांगली : पोटच्या दोन लेकरांना 20 हजाराला विकले, पाच दिवसांच्या मुलीची विक्री करताना आई सापडली

मुंबई तक

Sangli News : सांगली जिल्ह्यातील मिरज येथे आईने स्वतः पोटच्या दोन लेकरांची विक्री केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रत्येकी 20 हजार रुपये प्रमाणे दोन लहान मुलांची विक्री दीड वर्षांपूर्वी करण्यात आली होती. तिसऱ्या पाच दिवसांच्या मुलीची विक्री करत असताना महिला बाल कल्याण समाज सांगली जिल्हा यांच्या पथकाने करवाई करत मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. 

ADVERTISEMENT

Sangli News
Sangli News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सांगली : पोटच्या दोन लेकरांना 20 हजाराला विकले

point

पाच दिवसांच्या मुलीची विक्री करताना आई ताब्यात

Sangli News, स्वाती चिखलीकर : सांगली जिल्ह्यातील मिरज येथे आईने स्वतः पोटच्या दोन लेकरांची विक्री केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रत्येकी 20 हजार रुपये प्रमाणे दोन लहान मुलांची विक्री दीड वर्षांपूर्वी करण्यात आली होती. तिसऱ्या पाच दिवसांच्या मुलीची विक्री करत असताना महिला बाल कल्याण समाज, सांगली जिल्हा यांच्या पथकाने करवाई करत मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. 

हे ही वाचा : आधी भाजप आमदार, आता राष्ट्रवादी मंत्र्यांसोबतचे फोटो व्हायरल; भिगवण कथित अपहरण प्रकरणाला राजकीय वळण

20 हजारांना विक्री 

याप्रकरणी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी महादेव वाघमारे यांनी तक्रार दिली आहे. याबाबत मनीषा जाधव (रा.सुभाषनगर), उमाजी रमेश लोंढे, सुरेखा लोंढे, दशरथ लोंढे, सचिन गोसावी (रा. माधवनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी मनिषा जाधव हिने दीड वर्षापूर्वी आपल्या पहिल्या बालकाला 20 हजार रुपयाला कोल्हापूर चाळ, मिरज याठिकाणी विकले होते. त्यानंतर माधवनगर येथे आणखी एका बालकाला विकले. 

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर : खाकीचं स्वप्न धुळीला! पोलीस भरतीदरम्यान धावताना सांगलीच्या 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू...

हे वाचलं का?

    follow whatsapp