अकोल्यात बारावी बोर्डाच्या परिक्षा केंद्रावर विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात जाऊन सोडवला पेपर
Akola News : बारावी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्याने विद्यार्थिनीने रुग्णालयातच पेपर सोडवला. ही घटना अकोल्याचील मूर्तिपजापूर तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरील आहे. परीक्षा सुरु असताना एका विद्यार्थिनीची अचानकपणे प्रकृती बिघडली. प्रशासनाच्या तत्परतेनं विद्यार्थिनीला रुग्णालयात प्रश्नपत्रिका उरलब्ध करून परीक्षा पूर्ण करता आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बोर्डाच्या परिक्षा केंद्रावर विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली
विद्यार्थिनीने रुग्णालयात गणिताचा पेपर सोडवला
Akola News : बारावी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्याने विद्यार्थिनीने रुग्णालयातच पेपर सोडवला. ही घटना अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरील आहे. परीक्षा सुरु असताना एका विद्यार्थिनीची अचानकपणे प्रकृती बिघडली. प्रशासनाच्या तत्परतेनं विद्यार्थिनीला रुग्णालयात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून परीक्षा पूर्ण करता आली. ही घटना 21 फेब्रुवारी रोजी घडल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा : मुंबई: विक्रोळी पंप हाऊसच्या गेटवरून उडी मारताना मद्यधुंद तरुणाच्या हातात रॉड घुसला, मध्यरात्री उडाला गोंधळ
बोर्डाच्या परिक्षा केंद्रावर विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली
घडलेल्या घटनेनुसार, हिरापूर येथील अनंतराव देशमुख ज्यनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी श्रेया गुणवंतराव देशमुख ही परीक्षा केंद्रावर गणिताचा पेपर देण्यासाठी उपस्थित होती. सकाळी 10:50 वाजता तिची अचानकपणे प्रकृती बिघडल्याची आणि ती बेशुद्ध पडली, नंतर तिला चक्कर येऊ लागली. परिस्थिती बघता, कर्मचारी आणि तिच्या पालकांनी तातडीने तिला मूर्तिजापूर येथे महाराज रुग्णालयात दाखल केले होते.
हे ही वाचा : सॅनिटायझर ओतून गर्लफ्रेंडच्या गुप्तांगाला लावली आग, बॉयफ्रेंडचं सैतानी कृत्य; नेमकं कारण काय?
विद्यार्थिनीने रुग्णालयात गणिताचा पेपर सोडवला
पुढं 11:40 वाजता संबंधित अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जात विद्यार्थिनीशी चर्चा केली. प्रकृती स्थिर झाल्यानंतर विद्यार्थिनीने परीक्षा देण्यास स्पष्टपणे संमती दर्शवली होती. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका रुग्णालयात आणण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया सुरु असताना महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासनाच्या या माणुसकीपूर्ण आणि संवेदशनशील भूमिकेमुळे श्रेयाने नियोजित वेळेत आपला पेपर पूर्ण केला.










