Ajit Pawar: 'अरे हरा#$%* नो कुठे फेडाल ही पापं.. वाट्टोळं होईल..', अजितदादांचा पारा चढला!
Lok Sabha Election 2024: अजित पवारांनी पारनेरच्या जाहीर सभेत निलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावेळी बोलताना अचानक त्यांचा पाराही चढला. पाहा नेमकं काय घडलं.
ADVERTISEMENT

Ajit Pawar on Nilesh Lanke: पारनेर: लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पारनेरमध्ये जाहीर सभा घेतली. भाजप उमेदवार सुजय विखेंच्या प्रचाराला आलेल्या अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांचा मात्र खरपूस समाचार घेतला. सभेत अनेक गंभीर आरोप करत अजित पवारांचा पारा अचानक चढला. (lok sabha election 2024 serious allegations against nilesh lanke ajit pawar got angry in parner meeting ahmednagar lok sabha election)
भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्याविरोधात तगडं निलेश लंके यांनी आव्हान उभं केलं आहे. लोकसभा निवडणुआधी निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. ज्यानंतर त्यांना दक्षिण अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. पण हीच गोष्ट अजित पवार यांच्या बरीच जिव्हारी लागली.
हे ही वाचा>> Live : "पवार-ठाकरेंना ऑफर", मोदींच्या विधानाचा फडणवीसांनी सांगितला नेमका अर्थ
अजित पवार यांनी शरद पवारांपासून फारकत घेतल्यानंतर जे आमदार अजित पवारांसोबत गेले होते त्यामध्ये निलेश लंकेंचाही समावेश होता. पण वर्षभराच्या आतच निलेश लंके हे शरद पवारांकडे परतले. त्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाचा उमेदवार नसतानाही त्यांनी लंकेंविरोधात स्वत: प्रचार मोहीम हाती घेतली आहे.
दरम्यान, पारनेरच्या जाहीर सभेत अजित पवार हे MIDC च्या मुद्द्यावर बोलताना अचानक संतापले. एवढंच नव्हे तर त्यांनी 'वाट्टोळं होईल वज वाट्टोळं होईल..' असे उद्गारही काढले. पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले.