पिंपरी-चिंचवड महानगरपालिका : 2017 मध्ये राष्ट्रवादीला धक्का देत भाजपने मिळवली होती एकहाती सत्ता

मुंबई तक

Pimpri Chinchwad Mahanagar palika Election : सुरुवातीला औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडने हळूहळू निवासी, आयटी आणि शैक्षणिक केंद्र म्हणूनही ओळख निर्माण केली. मात्र, या वेगवान विकासासोबतच पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, गृहनिर्माण आणि पर्यावरणीय प्रश्न गंभीर होत गेले. या सगळ्याच आव्हानांचा भार महापालिकेवर येऊन पडला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका : 2017 मध्ये राष्ट्रवादीला धक्का देत भाजपने मिळवली होती एकहाती सत्ता

point

आताही अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये होणार लढत

पिंपरी-चिंचवड : पुण्याच्या शेजारी वेगाने विस्तारलेलं औद्योगिक आणि नागरी केंद्र म्हणून ओळख असलेलं पिंपरी-चिंचवड शहर हे केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर राजकीयदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या शहराचा कारभार पाहणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) ही राज्यातील सर्वात प्रभावी महानगरपालिकांपैकी एक आहे. त्यामुळेच येथील महापालिका निवडणूक नेहमीच राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारी ठरते.

महापालिकेची स्थापना आणि शहराची जडणघडण

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची अधिकृत स्थापना 11 ऑक्टोबर 1982 रोजी झाली. त्याआधी 1970 साली पिंपरी-चिंचवड नगरपरिषद अस्तित्वात आली होती. MIDC परिसर, ऑटोमोबाईल आणि उत्पादन क्षेत्रातील मोठ्या उद्योगांमुळे या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली. परिणामी लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि स्वतंत्र महानगरपालिकेची गरज निर्माण झाली. पुढील काळात अनेक गावांचा समावेश महापालिका हद्दीत करण्यात आला आणि शहराचा विस्तार वेगाने वाढला. सुरुवातीला औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडने हळूहळू निवासी, आयटी आणि शैक्षणिक केंद्र म्हणूनही ओळख निर्माण केली. मात्र, या वेगवान विकासासोबतच पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, गृहनिर्माण आणि पर्यावरणीय प्रश्न गंभीर होत गेले. या सगळ्याच आव्हानांचा भार महापालिकेवर येऊन पडला.

2017 ची महापालिका निवडणूक : भाजपची एकहाती सत्ता, राष्ट्रवादीला धक्का

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात 2017 ची निवडणूक निर्णायक ठरली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) राजकीय समीकरणं बदलवत स्पष्ट बहुमत मिळवलं. एकूण 128 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने तब्बल 77 जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केली. दीर्घकाळ शहरावर प्रभाव असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला 36 जागांवर समाधान मानावं लागलं. शिवसेनेला 9 जागा मिळाल्या, तर मनसेला केवळ 1 जागेवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही, जो त्या पक्षासाठी मोठा धक्का मानला गेला.

हे वाचलं का?

    follow whatsapp