Avinash Jadhav: मनसे नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल, कुणी केली तक्रार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोने व्यापाऱ्याला धमकावून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनसे नेते जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

point

याप्रकरणी झवेरी बाजारात सोन्याचा व्यवसाय करणाऱ्या 55 ​वर्षीय व्यक्तीने तक्रार केली

point

FIR नुसार नेमकं काय घडलं?

देव अमीश कोटक

ADVERTISEMENT

Mumbai Crime News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांचे नाव आता वादात सापडले आहे. मुंबईतील झवेरी बाजारातील एका सोने व्यापाऱ्याला धमकावून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनसे नेते जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Crime News gold trader filed Case against MNS leader Avinash Jadhav for demanding 5 crore extortion)

याप्रकरणी झवेरी बाजारात सोन्याचा व्यवसाय करणाऱ्या 55 ​वर्षीय व्यक्तीने तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, बुधवारी (1 मे) ही घटना त्यांच्या दक्षिण मुंबईतील झवेरी बाजार येथील कार्यालयात घडली. तक्रारदाराने पोलिसांना सांगितले की, वैभव ठक्कर नावाच्या व्यक्तीसोबत त्यांचे व्यावसायिक संबंध होते. व्यवहाराशी संबंधित काही समस्या सोडवण्यासाठी त्यांना त्यांच्या कार्यालयात बोलावले होते.

हे वाचलं का?

हेही वाचा: 'तुम्ही पवारांबद्दल..' 'भटकती आत्मा'वरुन राहुल गांधींनी सुनावलं!

मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी वैभव ठक्कर मनसे नेते अविनाश जाधव, त्यांचा ड्रायव्हर आणि इतर सहा जणांसह तेथे पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश जाधव आणि त्याच्या साथीदारांनी तक्रारदाराच्या मुलाला पोलीस कर्मचाऱ्यांसमोर मारहाण केली. यावेळी अविनाश जाधव यांनी 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही पीडित व्यक्तीने केला आहे.

लोकमान्य टिळक (एलटी) मार्ग पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, सोने व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून अविनाश जाधव आणि अन्य एका व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलमांतर्गत धमकी आणि खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 

ADVERTISEMENT

FIR नुसार नेमकं काय घडलं?

दक्षिण मुंबईतील एलटी मार्ग पोलीस स्थानकात, ठाण्यातील मनसे अध्यक्ष अविनाश जाधव आणि अन्य एका व्यक्तीविरुद्ध मारहाण आणि धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये खंडणीचा आरोपही नोंदवण्यात आला असून अन्य आरोपी वैभव ठक्करचे नावही तक्रारीत समाविष्ट आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा: 'त्या' VIDEO वरून ठाकरेंनी राणेंना डिवचलं, म्हणाले अरे प्रश्न...

आरोप आहे की, वैभव ठक्कर याने तक्रारदार शैलेश जैन (55) यांना परिचय देताना सांगितले होते, 'ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी आहेत आणि त्यांनी जैन यांना एकदा मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा येथे घेऊन जाण्याबद्दलही बोललं होतं.'


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT