Lok Sabha Election 2024: 'मोदी तुम्ही पवारांबद्दल..', 'भटकती आत्मा'वरुन राहुल गांधींनी सुनावलं!
Rahul Gandhi: पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरून आता राहुल गांधींनी खडे बोल सुनावले आहेत. पाहा पुण्यातील सभेत राहुल गांधींना नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT
Rahul Gandhi Criticized PM Modi: पुणे: लोकसभा निवडणूक 2024 मधील प्रचार सभांमधून पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच पुण्यात झालेल्या सभेत राहुल गांधींनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांच्यावर 'भटकती आत्मा' अशी टीका करणाऱ्या मोदींवर राहुल गांधींनी पुण्यात जोरदार निशाणा साधला. (lok sabha election 2024 pm modi calls sharad pawar a wandering soul rahul gandhi criticized to pm)
ADVERTISEMENT
'शरद पवार यांचा पंतप्रधान मोदी हे अपमान करत आहेत. त्यांच्याविषयी उलट-सुलट गोष्टी बोलत आहेत. पंतप्रधानांनी थोडी तरी पातळी सांभाळली पाहिजे.' असं म्हणत राहुल गांधींनी मोदींना खडे बोल सुनावले आहेत.
'पवारांबद्दल मोदी उलट-सुलट बोलतात.. काय फायदा होतोय?'
'राजकारणातील जे ज्येष्ठ नेते आहेत, शरद पवार यांचा पंतप्रधान मोदी हे अपमान करत आहेत. त्यांच्याविषयी उलट-सुलट गोष्टी बोलत आहेत. पंतप्रधानांनी थोडी तरी पातळी सांभाळली पाहिजे.'
'पंतप्रधानाने देशाबाबत बोललं पाहिजे. विकास, शेतकरी याबाबत बोललं पाहिजे. ज्येष्ठ नेत्याचा अपमान करणं.. याचा अर्थ काय आहे? काय फायदा आहे यामध्ये त्यांचा.. त्यांना काय वाटतं की, भारतातील जनता खुश होईल?' असं राहुल गांधी म्हणाले.
हे वाचलं का?
'मी महाराष्ट्रात येतो ना तेव्हा बरं वाटतं, कारण...'
पुढे राहुल गांधी असंही म्हणाले की, 'जेव्हा मी महाराष्ट्रात येतो ना.. मला वाटतं की, हे काँग्रेसी राज्य आहे.. मी जेव्हा-जेव्हा इथे येतो तेव्हा-तेव्हा मला बरं वाटतं, मजा येते..'
हे ही वाचा>> महाराष्ट्रातील दहा खासदारांना तिकीटं न देण्याची 'ही' आहेत कारणं
'मी संघटनेबाबत बोलत नाहीए.. मी विचारधारेबाबत बोलतोय. तुमच्या लोकांमध्ये हजारो वर्षांपासून काँग्रेसची विचारधारा आहे. तुम्हाला सांगावं देखील लागत नाही. तुमच्या मनात तेच आहे, तुमच्या चेहऱ्यावर तेच दिसतं.. इथे नैसर्गिक काँग्रेसचे विचार आहेत.'
ADVERTISEMENT
'तुमच्या रक्तामध्ये स्वातंत्र्याची लढाई.. फुलेजींचे विचार, आंबेडकरांचे विचाराधारा, गांधी-नेहरूंची विचारधारा आहे. ती काढता येणार नाही. तुम्ही खरंच माझा मूड चांगला बनवलात..' असं म्हणत राहुल गांधींनी महाराष्ट्र हे काँग्रेस विचारांचं राज्य असल्याचं म्हटलं
ADVERTISEMENT
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना राहुल गांधींचं मोठं आश्वासन
'मी जेव्हा महाराष्ट्रात येत होतो तेव्हा मला अनेक तरुणांनी सांगितलं की, राहुलजी मोदींनी आम्हाला बेरोजगार बनवलं.. ज्या दिवशी आम्हाला पेपर द्यायचा असतो त्याच्या आदल्या दिवशी पेपर लीक होतो. जो बेईमानी करतो तो पेपर लीक करतो..'
हे ही वाचा>> 'रात्री कट कारस्थानं करून माझं..', मोदींवर ठाकरेंचा थेट आरोप
'जो इमानदारीने अभ्यास करतो त्याचं नुकसान होतं. म्हणून आम्ही जाहीरनाम्यात स्पष्ट म्हटलं आहे की, पेपर लीक प्रकरणी आम्ही कठोर कायदा आणू आणि त्यामुळे पेपर लीक करणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल.'
'नरेंद्र मोदींनी जी नवी फॅशन आणलीए की, परीक्षा या खासगी संस्थांमार्फत घेण्यात येत आहेत. त्या गोष्टी आम्ही बंद करून. आम्ही परीक्षा शासकीय संस्थांच्या माध्यमातूनच घेऊ. जर कोणी पेपर लीक केला तर त्याला कठोर शिक्षाही देऊ.' असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT