Raj Thackeray : 'पवारांसोबत राहूनही अजितदादांनी कधीही...', राज ठाकरेंकडून अजित पवारांचं प्रचंड कौतुक!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Lok Sabha Election 2024 Pune Raj Thackeray: पुणे: लोकसभा निवडणूक 2024 साठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आज (10 मे) त्यांनी पुण्यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. पण याच सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (lok sabha election 2024 despite staying with sharad pawar ajit pawar never played caste politics raj thackeray praised ajitdada in pune bjp murlidhar mohal public meeting)

ADVERTISEMENT

राज ठाकरे यांनी आतापर्यंत अनेकदा अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. मात्र आता महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच अजित पवार यांचं कौतुक केलं आहे.

'मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी पाहत आलो अजित पवारांच्या.. पण एका गोष्टीबाबत.. शरद पवारांसोबत राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही.' अशा शब्दात राज ठाकरेंनी अजित पवारांच कौतुक केलं.. 

हे वाचलं का?

राज ठाकरेंकडून अजित पवारांचं कौतुक, पाहा नेमकं काय म्हणाले...  

'शरद पवार साहेबांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली 1999 साली.. आज राष्ट्रवादी काँग्रेसची  लोकं इथं आहेत. पण ती अजितदादांसोबत आहेत. बाकी अनेक मतभेद असतील अजित पवारांसोबत.. पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो.. अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं..' 

हे ही वाचा>> 'मला डोळा मार, पवारांना डोळा मार..', ठाकरेंची PM मोदींवर टीका

'मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी पाहत आलो त्यांच्या.. पण एका गोष्टीबाबत.. शरद पवारांसोबत राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही.' 

'हे सगळं जातीपातीचं विष 1999 सालापासून कालवायला सुरुवात झाली. हे इथे संभाजी पार्कमध्ये राम गणेश गडकरींचा पुतळा उखाडला गेला होता. अरे माहितए का ते कोण आहेत?' 

'अनेकांना वाटलं ते नितीन गडकरींचे नातेवाईक आहेत म्हणून उखडला.. काही माहिती नाही.. कशाचा कशाला संबंध नाही. पण या सगळ्या गोष्टी..' 

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'हरा#$%* नो कुठे फेडाल पापं, वाट्टोळं होईल..', अजितदादा संतापले!

'ते जेम्स लेन प्रकरण आणलं गेलं.. त्यातून विष पेरलं गेलं. कोण कुठचा जेम्स लेन.. बरं तो जेम्स लेन मुलाखती देतोय. सांगतोय.. की, मी कुठल्या माणसाचं नाव घेतलंही नव्हतो आणि त्यांना भेटलोही नव्हतो. तोपर्यंत तुमच्याच विष कालवून झालं होतं. का विष कालवलं गेलं? तर तुम्ही जातीकडे पाहावं आणि मतदान करावं.' असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांचं पहिल्यांदाच कौतुक केलं आहे.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT