Udddhav Thackeray: 'मला डोळा मार, कधी पवारांना डोळा मार..', ठाकरेंची PM मोदींवर तुफान टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

udhhav thackeray reply pm narendra modi on duplicate shiv sena salapur lok sabha election 2024 praniti shinde ram satpute
तुमचा भाजप पक्ष भाकड आणि भेकड जनता पक्ष झालाय.
social share
google news

Lok Sabha Election 2024 Udddhav Thackeray: छ. संभाजीनगर: लोकसभा निवडणूक 2024 साठी छ. संभाजीनगरमध्ये जाहीर सभेत बोलताना शिवसेना (UBT)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. (lok sabha election 2024 see uddhav thackeray stormy criticism of pm modi what exactly he said in chhatrapati sambhajinagar)

ADVERTISEMENT

'मोदींनी शिवसेना फोडली, तोडलीत.. राष्ट्रवादी तोडली, फोडली तरी देखील कधी मला डोळा मारला, कधी पवारांना डोळा मार.. आज सकाळी पवारांना डोळा मारला.. की या आमच्याकडे.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींच्या ऑफरवर जोरदार टीका केली.

छ. संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले...

'मोदीजी तुम्ही जी भाषा वापरत आहात ती तुम्हाला शोभा नाही देत. माझ्या हिंदुस्थानला आणि माझ्या महाराष्ट्राला ही भाषा चालूच शकत नाही. आम्ही खपवूनच घेऊ शकत नाही. कारण हा महाराष्ट्र आणि हा मराठवाडा हा साधूसंतांचा आहे. एकमेकांचा आदर करणार आहे.' 

हे वाचलं का?

नेमकं तुम्ही ठरवा काय करायचं ते.. आजपर्यंत तुम्ही सगळं फोडलंत. शिवसेना फोडली, तोडलीत.. राष्ट्रवादी तोडली, फोडली तरी देखील कधी मला डोळा मारला, कधी पवारांना डोळा मार.. आज सकाळी पवारांना डोळा मारला.. की या आमच्याकडे.

हे ही वाचा>> 'चक्की पिसिंग अँड पिसिंग...' अजितदादांच्या तोंडी फडणवीसांची भाषा

'एका ठिकाणी बोलायचं ही नकली शिवसेना, राष्ट्रवादी आहे.. आणि मग म्हणायचं की, आजा मैरे गाडी मैं.. बैठ जा..' 

'एवढे घाबरलेत... एवढे घाबरलेत त्यांना कळून चुकलं आहे की, आता हे परत दिल्ली बघत नाही.. आणि महाराष्ट्र तुम्हाला पुन्हा दिल्ली बघूही देणार नाही.' 

ADVERTISEMENT

'तुम्ही वेडंवाकडं काही बोलता... आम्ही कधीही तुमच्या कौटुंबिक, खाजगी जीवनाबाबत बोललो नव्हतो. इच्छाही नाही. पण मोदीजी 2014 साली पंतप्रधान व्हावं यासाठी माझी पत्रावर सही घेतली. पण काल तुम्ही जे बोललात त्यासाठी मी तुम्हाला क्षमा करु शकत नाही.. माझा महाराष्ट्र तुम्हाला क्षमा करणार नाही.' 

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'हरा#$%* नो कुठे फेडाल पापं, वाट्टोळं होईल..', अजितदादा संतापले!

'तुम्ही शिवसेनेला नकली म्हणालात.. एवढंच नाही तर तुम्ही मला बाळासाहेबांचा नकली संतान म्हणालात.. नकली संतान.. बोलताय.. तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकलात की काय?' अशी जहरी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

 

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT