Ajit Pawar: 'चक्की पिसिंग अँड पिसिंग...' अजितदादांच्या तोंडी फडणवीसांची भाषा, कोणाला दिला दम?

मुंबई तक

ADVERTISEMENT

'चक्की पिसिंग अँड पिसिंग...' अजितदादांच्या तोंडी फडणवीसांची भाषा
'चक्की पिसिंग अँड पिसिंग...' अजितदादांच्या तोंडी फडणवीसांची भाषा
social share
google news

Ajit Pawar Chakki Peesing Dialogue Devendra Fadnavis: पारनेर: 'चक्की पिसिंग अँड पिसिंग..' हा डायलॉग राजकारणात सर्वाधिक प्रचलित केला तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी.. तो देखील अजित पवार यांच्या कथित सिंचन घोटाळ्याविषयी आरोप करताना.. पण आता हाच सेम डायलॉग खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेरच्या जाहीर सभेत मारला. (lok sabha election 2024 ahmednagar  deputy chief minister ajit pawar said  chakki peesing dialogue criticized nilesh lanke in a public meeting in parner )

'कोणी जर तिथे लुबाडणूक केली असेल, पैसे खाल्ले असतील तर अशांना चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग..' असं म्हणत अजित पवार यांनी पारनेरच्या सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंकेंना थेट इशाराच दिला आहे. भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यासाठी अजित पवार यांनी आज (10 मे) पारनेरमध्ये जाहीर सभा घेतली. त्या सभेत त्यांनी मार्केट कमिटीतील व्यवहाराविषयी बोलताना चक्की पिसिंग हा डायलॉग मारला. 

आता अजित पवार म्हणाले चक्की पिसिंग.. पिसिंग अँड पिसिंग....

'पारनेर हा माझा दुष्काळी तालुका.. त्यामुळे या भागातील लोकं मुंबई-पुण्यात कामाधंद्यासाठी जातात. मग इथे काय केलं पाहिजे.. वेगवेगळ्या पद्धतीने संस्था चालल्या पाहिजे, कारखानदारी आली पाहिजे..'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून सहकाराच्या माध्यमातून सुबत्ता आणण्याचं काम झालं. आम्ही देखील संस्था चालवतो. पारनेरकरांनो विचार करा.. इथल्या पतसंस्था इतक्या चांगल्या चालल्या होत्या. त्या कोणी अडचणीत आणल्या?, कोणी त्यात पैसा खाल्ला, कोणी बोगस प्रकरणं केली? त्यामुळे ठेवी कशा अडचणीत आल्या. याचा विचार करा ना..'

हे ही वाचा>> "...त्यामुळे ते अस्वस्थ आहेत", मोदींच्या 'ऑफर'वर पवारांचं विधान

'माझा पारनेर कारखाना.. कोणी त्यात अडचण निर्माण केली. संस्था काढणं एकवेळ सोपं असतं पण संस्था चालवणं हे महामुष्कील असतं. पारनेर कारखान्याची वाट लागली, इथल्या पतसंस्था अक्षरश: देशोधडील्या लागल्या.' 

ADVERTISEMENT

'इथली मार्केट कमिटी चांगली चालली होती. तिथे सभापती होता.. नंतरच्या काळात निलेशने मला सांगितलं दादा त्याला बदला.. त्याला बदलला.. दुसरा कोण आणून ठेवला शहाणा.. त्याने तर त्याची वाटच लावून टाकली.' 

ADVERTISEMENT

'त्यांना म्हणावं कितीही झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी हे झाकलं जाणार नाही. या संदर्भात मार्केट कमिटीमध्ये कोणीही जर चुका केलेल्या असतील. माझ्या पारनेरच्या शेतकऱ्यांच्या मालकीची ती कमिटी आहे. कोणाच्या बापाच्या घरची मार्केट कमिटी नाही. त्यामुळे त्याची चौकशी होईल.' 

'कारण नसताना कोणाला त्रास दिला जाणार नाही. परंतु कोणी जर तिथे लुबाडणूक केली असेल, पैसे खाल्ले असतील तर अशांना चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग..'  

हे ही वाचा>> Live : 'माझ्या नादी लागतो त्याचा मी बंदोबस्त करतो', अजित पवारांचा लंकेंवर हल्लाबोल

'चौकशी केली जाईल... दूध का दूध और पानी का पानी.. चुकीचं असेल तर शासन.. चुकीचं नसेल तर तुम्हाला मोकळीक. ही आपली कामाची भूमिका आहे.' असं विधान अजित पवारांनी जाहीर सभेत केलं आहे. 

अजितदादांबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणालेले चक्की पिसिंगं अँड पिसिंग... 

2014 विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तुफान टीका केली होती. तसेच सिंचन घोटाळ्यावरुन त्यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला होते. तेव्हा फडणवीस म्हणाले होते की, 'सिंचन घोटाळ्यामध्ये अजितदादांची अवस्था आम्ही  काय करणार.. आमच्या नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर.. आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग.. पिसिंग.. अँड पिसिंग..' असं थेट देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. 

अशा पद्धतीची टीका केल्यानंतर आज त्याच अजित पवारांना भाजपने सत्तेत सहभागी करून घेतलं आहे. ज्यावरून विरोधक हे त्यांना सातत्याने लक्ष करत आहेत. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT