PUBG Addiction : आई-वडील रक्ताच्या थारोळ्यात… PUBG मुळे मुलाचे राक्षसी कृत्य!
सतत पबजी गेम खेळणाऱ्या मुलाचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने आईवडिलांची हत्या केली. उत्तर प्रदेशातील झाशी येथे ही घटना घडली.
ADVERTISEMENT
PUBG Addiction cases : मोबाईलच्या व्यसनामुळे आरोग्यावर होत असलेल्या परिणांबद्दल आपण दररोज ऐकतो, वाचतोच. पण, त्यातही भयंकर व्यसन ठरत आहेत, मोबाईलमधील गेम. पबजी गेमच्या आहारी गेलेल्या एका मुलाने थेट आईवडिलांनाच संपवल्याची धक्कादायक आणि चिंता करायला लावणारी घटना घडलीये.
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशातील झाशी येथे मुलाने आई-वडिलांची धारदार शस्त्राने हत्या केली. दूधवाला घरी पोहोचल्यावर ही बाब उघडकीस आली. त्यांनी घरात डोकावून पाहिले असता घरमालक व त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, मुलाने आई-वडिलांचा खून केल्याची कबुली दिली आहे.
मुलाने आईवडिलांची केली हत्या, प्रकरण काय?
घटना आहे झाशी शहरातील नवााबाद पोलीस स्टेशन परिसरातील. पेशाने सरकारी शिक्षक असलेले लक्ष्मी प्रसाद (वय 60) हे त्यांची पत्नी विमला (वय 55) आणि मुलगा अंकित (वय 28) यांच्यासोबत गुमनाबार परिसरात राहायचे.
हे वाचलं का?
वाचा >> पती-पत्नी और वो! Boss च्या पत्नीला कळलं आणि जीवच गेला; 5 जणांनी काय केलं?
शनिवारी सकाळी दूधवाला लक्ष्मीप्रसाद यांच्या घरी दूध देण्यासाठी आला होता. त्याने दरवाजा ठोठावला, पण आतून कोणीच बाहेर आले नाही. दूधवाल्याने घरात डोकावून पाहिले तेव्हा लक्ष्मी प्रसाद आणि त्यांची पत्नी विमल रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हे पाहून दूधवाल्याला धक्काच बसला.
वाचा >> Crime: मुलांसोबत सैतानी कृत्ये! गुप्तांगात भरली मिरची पावडर, मानवी मूत्र पाजलं अन्…
त्यांनी आरडाओरडा करून परिसरातील लोकांना एकत्र केले. बरेच लोक तिथे जमा झाले. कसेबसे ते लोक लक्ष्मीप्रसाद यांच्या घरात घुसले. लक्ष्मी प्रसाद व त्यांची पत्नी विमला हे गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर पडले होते तर त्यांचा मुलगा अंकित हा घाबरून खोलीत बसला होता.
ADVERTISEMENT
उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाला
दरम्यान, या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोन्ही जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. पण, येथे पोहोचण्यापूर्वीच लक्ष्मी प्रसाद यांचा मृत्यू झाला होता. उपचारादरम्यान विमला यांचाही मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला, तर मुलगा अंकितला ताब्यात घेतले.
ADVERTISEMENT
मुलाने कशी केली आई-वडिलांची हत्या?
या प्रकरणाची माहिती देताना झाशीचे एसएसपी राजेश एस यांनी सांगितले की, मुलाने लाठीने मारहाण केल्यामुळे पती-पत्नीचा मृत्यू झाला. मानसिक संतुलन बिघडलेल्या मुलाने खुनाची कबुली दिली आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.
PUBG खेळताना बिघडले अंकितचे मानसिक संतुलन
दोन वर्षांपासून अंकितचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचे समोर आले आहे. तो PUBG गेम खेळायचा. दिवस असो वा रात्र, तो सतत PUBG खेळत असायचा. खेळाच्या व्यसनामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले. तेव्हापासून त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. लोकांच्या म्हणण्यानुसार, त्याने प्रथम आपल्या वडिलांवर हल्ला केला आणि नंतर त्याच्या आईला बेदम मारहाण केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT