शरद मोहोळ हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट, सूड मिळवण्यासाठी गेम प्लॅन सुरू...

मुंबई तक

Pune Crime : कुख्यात गुंड शरद मोहोळची कोथरूड येथे 5 जानेवारी 2024 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. खूनाचा बदला घेण्यासाठी गेमप्लॅन करणाऱ्या एकाला ताब्यात घेतलं आहे.

ADVERTISEMENT

Sharad Mohol murder case In twist
Sharad Mohol murder case In twist
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कुख्यात गुंड शरद मोहोळची कोथरूड येथे 5 जानेवारी 2024 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली

point

शरद मोहोळच्या खूनाचा बदला घेण्यासाठी गेमप्लॅन करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Pune Crime : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची कोथरूड येथे 5 जानेवारी 2024 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याला एक वर्ष होऊन गेलं आहे. या प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून मोठी अपडेट समोर आली आहे. शरद मोहोळच्या खूनाचा बदला घेण्यासाठी गेमप्लॅन सुरू होतं. अशातच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकाला ताब्यात घेतलं आहे. 

हेही वाचा : 'मी लवकरच येईल..Love You कुश मुश', ज्योती मल्होत्राने टाकला 'लेटरबॉम्ब', पोलिसांना सापडली खतरनाक डायरी

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीकडून काही हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. ज्यात पिस्तूलाचा समावेश करण्यात आला आहे. ओंकार सचिन मोरे असं आरोपीचं नाव होते. तो काही दिवस फरार होता. आता त्याला पोलिसांनी रात्रीच्या सुमारास आपल्या ताब्यात घेण्यात आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी ओंकर मोरे हा शरद मोहोळच्या हत्येचा सूड घेण्यसाठी प्लॅनिंग करत होता. त्याने त्याचं सर्व नियोजनही केलं होतं. दरम्यान या प्रकरणात त्यांच्यासोबत इतर काही आरोपी असल्याची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. त्यांच्या या कटामध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे? या प्रकरणाचा तपास आता पुणे पोलीस करताना दिसत आहे. 

हेही वाचा : Pune Crime : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर गोळीबार, बुलेट कारची काच तोडून...

शरद मोहोळची हत्या

दरम्यान, पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याला 5 जानेवारी 2024 रोजी भरदुपारी कोथरुड येथील सुतारदरा परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याचा साथीदार असणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने हा गोळीबार केला होता.  

तपासादरम्यान, गोळीबार करणारे आरोपी हे मुळशीतील विठ्ठल शेलार गँगमधील असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, गुंड असणाऱ्या विठ्ठल शेलारसह इतर 17 जणांवर मकोका कारवाई करण्यात आली आहे. 


हे वाचलं का?

    follow whatsapp