RSS हेडक्वॉर्टरवरील हल्ल्याच्या मास्टरमाइंडला 'अज्ञात हल्लेखोराने' पाकिस्तानात संपवलं, काय आहे Inside स्टोरी?

मुंबई तक

Saifullah Khalid : लश्कर-ए-तैयबाचा कुख्यात दहशतवादी असणाऱ्या रजाउल्लाह निजामनी उर्फ सैफुल्लह खालिदची हत्या करण्यात आली आहे. भारतावरील झालेल्या हल्ल्यात त्याचा मोठा हात होता.

ADVERTISEMENT

Saifullah Khalid Lashkar - e- taiba terrorist has been killed in pakistan
Saifullah Khalid Lashkar - e- taiba terrorist has been killed in pakistan
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लश्कर-ए-तैयबाचा कुख्यात दहशतवादी सैफुल्लह खालिदला तीन अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली.

point

नागपुरातील एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यालयावरती 2006 मध्ये हल्ल्याचं प्लॅनिंग केलं होतं.

Saifullah Khalid : लश्कर-ए-तैयबाचा कुख्यात दहशतवादी असणाऱ्या रजाउल्लाह निजामनी उर्फ सैफुल्लाह खालिदची हत्या करण्यात आली आहे. राजाउल्लाहने नागपुरातील एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यालयावरती 2006 मध्ये हल्ल्याचं प्लॅनिंग केलं होतं. या व्यतिरिक्त त्याचा भारतातील अनेक हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये हात होता. रविवारी 18 मे 2025 रोजी तीन अज्ञातांनी खालिदवर गोळीबार करत त्यांची पाकिस्तानातील सिंध प्रांतात हत्या केली. 

हेही वाचा : ज्योती मल्होत्राची मैत्रीण पण करायची PAK साठी काम..? कोण आहे Youtuber प्रियंका सेनापती?

भारतात याआधी अनेक दहशतवादी हल्ले झाले होते. अशावेळी अबू सैफुल्लाह खालिदचा यात समावेश होता. तो लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा संचालक होता. त्याने मूळ ओळख लपवत गाजी, विनोद कुमार, मोहम्मद सलीम अशी टोपणनावं ठेवली होती. 

दरम्यान,2005 मध्ये बंगळुरु येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात फुल्लाह खालिदचा समावेश होता. ज्यात आयआयटीचे प्रोफेसर मुनीश चंद्र मारले गेले होते. या व्यतिरिक्त सैफुल्लाह खालिद 2008 मध्ये उत्तर प्रदेशातील रामपुरमधील CRPF कॅम्प हल्ल्यातील मास्टरमाईंड होता. ज्यात सात सैनिक जवान आणि एक व्यक्ती मारला गेला होता. 

खालिद हा नेपाळमधील लष्कर मॉड्यूलचा प्रमुख म्हणून काम करत होता. त्याने भारत-नेपाळ सीमेपलीकडे दहशतवाद्यांच्या हालचाली सुनिश्चित केल्या. तो इतर लष्कर कमांडरसोबत नेटवर्क चालवण्याचे काम करत होता. फुल्लाह खालिदच्या कृत्याला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पर्दाफाश करत जगाच्या समोर आणलं. त्यासंबंधित कारवाया सुरू ठेवलेल्या आहेत. 

हेही वाचा : सविताचा मृतदेह लाल रंगाच्या सुटकेसमध्ये, बॅगजवळ बसलेला अशोकचं तुम्हा-आम्हाला हादरवून टाकणारं कृत्य

गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानात अज्ञात हल्लोखोरांनी 16 हून अधिक दहशतवादी मारले आहेत. यात लष्कर आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या संघटनांच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करत ठेचण्यात आलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp