ज्योती मल्होत्राची मैत्रीण पण करायची PAK साठी काम..? कोण आहे Youtuber प्रियंका सेनापती?
Youtuber Priyanka Senapati : ज्योती मल्होत्रानंतर आता तिची मैत्रीण प्रियांका सेनापतीचं हेरगिरी प्रकरणात नाव समोर आले आहे. नेमकी प्रियांका सेनापती कोण आहे? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ज्योती मल्होत्राच्या मैत्रिणीचाही हेरगिरी प्रकरणात समावेश असल्याची शक्यता आहे.

कोण आहे Youtuber प्रियांका सेनापती?
Youtuber Priyanka Senapati : ज्योती मल्होत्रावर हेरगिरी केल्याचे अनेक आरोप करण्यात आले आहेत. यानंतर आता आणखी एका युट्यूबर्सचं नाव चर्चेत आले आहे. ती व्यक्ती म्हणजे प्रियांका सेनापती आहे. प्रियांका ही पेशाने एक युट्यूबर आहे. ज्योतीनंतर आता तिचंही नाव हेरगिरी प्रकरणात समोर आलं आहे. प्रियांकावरही या संबंधित प्रकरणात संशय व्यक्त केला जात आहे. प्रियांका ही गेली तीन-चार महिन्यांपूर्वी पाकिस्तानातील कर्तारपूर येथे आली होती. त्यानंतर प्रियांकाची ज्योतीसोबत मैत्री झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान कनेक्शन, अखेर वडिलांनी सांगितली खरी कहाणी
प्रियांकाची मैत्रिण ज्योतीसाठी पोस्ट
प्रियांकाचे कर्तारपुर येथील भेटीमागचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रियांकाने तिच्या सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी लिहिलं की, "ज्योती माझी फक्त एक चांगली मैत्रीण होती. मी तिच्यासोबत एका YouTube च्या माध्यमातून संपर्कात आली. तिच्यावर नेमके कोणते आरोप केले आहेत याबाबत मला काही माहिती नाही. जर ती शत्रू असणाऱ्या पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असती तर मी तिच्याशी मैत्रीच केली नसती." त्यानंतर तिने पुढे लिहिलं की, "जर कोणत्याही तपास यंत्रणांना माझा तपास करायचा असेल तर मी त्यांना सहकार्याची भावना दाखवेल. राष्ट्र हे सर्वप्रथम आहे. जय हिंद..," अशी पोस्ट प्रियांकाने केली होती.
प्रियांका सेनापतीचे ज्योती मल्होत्राशी असलेले संबंध तपास यंत्रणांपर्यंत पोहेचले आहेत. अशातच त्यांच्यावर हेरगिरी प्रकरणचा आरोप करण्यात आला आहे. पुरी येथील भेटीदरम्यान प्रियांका ज्योती मल्होत्राला जगन्नाथ मंदिरात घेऊन गेली.
दरम्यान, प्रियंका सेनापती यांनी ज्योती मल्होत्राबाबत केलेल्या पोस्टमुळे अडचणी निर्माण होतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, प्रियांकाला अद्याप अटक केलेली नसून ती पुरी येथील तिच्या राहत्या घरी आहे. अशातच गुप्तचर विभागने ज्योती मल्होत्रानंतर आता प्रियांकाची चौकशी केली.
हेही वाचा : शिवराज दिवटे मारहाणप्रकरणात 'बीड बंद'ची हाक, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
प्रियांकाच्या वडिलांनी प्रतिक्रिया
या प्रकरणात आता प्रियांकाच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली की, मला यातील काहीही माहिती नाही. अलिकडेच कळले की, ज्योती मल्होत्राला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. माझी मुलगी प्रियांका ही एक युट्यूबर आहे. ती सप्टेंबर 2024 मध्ये पुरी येथे आलेल्या ज्योतीसोबत संपर्कात आली. ज्योती कुठे राहते याती कल्पना नव्हती. ती आमच्या घरी कधीही आली नव्हती,अशी प्रतिक्रिया प्रियांकाच्या वडिलांनी दिली.