'मी लवकरच येईल..Love You कुश मुश', ज्योती मल्होत्राने टाकला 'लेटरबॉम्ब', पोलिसांना सापडली खतरनाक डायरी

मुंबई तक

Jyoti Malhotra Letter Viral : पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक असलेल्या ज्योती मल्होत्राची चौकशी सुरु आहे. याचदरम्यान, हरियाणा पोलीस तिला काही वेळासाठी हिसारमध्ये तिच्या घरी घेऊन गेले होते

ADVERTISEMENT

Jyoti Malhotra Viral Letter
Jyoti Malhotra Viral Letter
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ज्योती मल्होत्राबाबत धक्कादायक माहिती समोर

point

पोलिसांनी सापडली अत्यंत महत्त्वाची डायरी

point

ज्योतीने डायरीत काय लिहिलंय?

Jyoti Malhotra Letter Viral : पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक असलेल्या ज्योती मल्होत्राची चौकशी सुरु आहे. याचदरम्यान, हरियाणा पोलीस तिला काही वेळासाठी हिसारमध्ये तिच्या घरी घेऊन गेले होते. तिथे ती कुटुंबियांना भेटली नाही. पण ज्योतिच्या रुममध्ये पोलिसांना एक नोटबूक मिळाली. त्यात पोलिसांना एक पत्र सापडलं आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, या लेटरची हँडरायटिंग ज्योतीच्या हँडरायटिंगला मॅच होते. या पत्रात ज्योतीने लिहिलंय, सविताला सांग फळ घेऊन ये. घराची काळजी घे. मी लवकरच परत येईन. याशिवाय तिने काही महत्त्वाच्या औषधांची माहितीही या पत्रात लिहिली आहे. ही औषधे घरी घेऊन येण्यासाठी ज्योतीने पत्राद्वारे सांगितलं आहे. पत्राच्या शेवटी ज्योतीने लिहिलंय, Love You Kush Mush, यावरून अंदाज लावण्यात येतो की, कुटुंबात तिला याच नावाने हाक मारली जाते. पण पोलीस या पत्राला एक संभाव्य कोड मेसेजच्या रुपातही पाहत आहेत. 

हे ही वाचा >> भाजीविक्रेता ते नेता, जेलवारी ते मंत्रिपद, अनेकदा चढ उतार... छगन भुजबळांचं कमबॅक कसं झालं?

ज्योतिला अटक केल्यानंतर कुटुंबियांनी तिचे फोटो रुममधून काढून टाकले आहेत. तिच्या वडिलांनी घरात असलेले सर्व फोटो काढले आहेत. ज्योती हिसारमध्ये नेहमी तिच्या मित्रांना भेटायला जायची, असं शेजाऱ्यांचं म्हणणं आहे. परदेशी दौऱ्यातही डायरी तिच्याजवळ असायची. बाली इंडोनेशिया ट्रीपनंतर लाखो रुपये खर्च झाल्याचं तिनं एका व्हिडीओत सांगितलं होतं.

दरम्यान, ज्योतीच्या काश्मीर यात्रेवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तपसा यंत्रणा तिची पहलगाम यात्रा, गुलमर्ग, डल लेक, लडाख आणि पेंगाँग झीलच्या यात्रेबाबत कसून चौकशी करत आहेत. या सर्व जागेवर तिने अनेक व्हिडीओ शूट केले आहेत. यापैकी काही सोशल मीडियावर अपलोडही केले. हे व्हिडीओ दशहतावादी संघटनांना पाठवण्याच्या उद्देशाने बनवले का? याचा पोलीस तपास करत आहेत. 

हे ही वाचा >> Pune Crime : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर गोळीबार, बुलेट कारची काच तोडून...

हे वाचलं का?

    follow whatsapp