भाजीविक्रेता ते नेता, जेलवारी ते मंत्रिपद, अनेकदा चढ उतार... छगन भुजबळांचं कमबॅक कसं झालं?

सुधीर काकडे

Chhagan Bhujbal Oath Ceremony: 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले, पण डिसेंबर 2024 मध्ये मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळांना स्थान मिळालं नाही. यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास

point

ओबीसी नेते म्हणून वजन कायम, पुन्हा मिळालं मंत्रिपद

point

धनंजय मुंडे यांच्याकडे जे खातं होतं, ते आता भुजबळांना!

Chhagal Bhujbal: छगन चंद्रकांत भुजबळ... महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक महत्वाचं नाव आहे. भुजबळांचा राजकीय प्रवास हा मोठ्या चढ-उतारांनी भरलेला आहे. बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यापर्यंत आणि तुरुंगवासापासून पुन्हा मंत्रिपदापर्यंत त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. आज, 20 मे 2025 रोजी त्यांनी महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. 

शिवसेना ते राष्ट्रवादी... व्हाया काँग्रेस 

छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास 1960 च्या दशकात मुंबईतून सुरू झाला. नाशिकमधील माळी समाजातील एक साधा भाजी विक्रेता ते मुंबई महानगरपालिकेचा महापौर अशी त्यांची राजकीय कारकीर्दीची सुरूवात झाली. त्यांनी 1973 मध्ये शिवसेनेतून राजकारणात प्रवेश केला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पठडीत ते तयार झाले. 1985 आणि 1991 मध्ये ते मुंबईचे महापौर म्हणून काम करत छाप पाडली. 

हे ही वाचा >> छगन भुजबळ घेणार मंत्रिपदाची शपथ, कुणाला बसणार धक्का? राजकीय घडामोडींचा अर्थ काय?

1991 मध्ये भुजबळांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तेव्हा भुजबळ त्यांच्यासोबत गेले आणि पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष बनले. 1999 मध्ये ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांच्याकडे गृह आणि पर्यटन विभागाचा कार्यभार होता. 2004 ते 2008 दरम्यान ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. तर 2009-2010 मध्ये ते पुन्हा उपमुख्यमंत्रिपद झाले.

भुजबळ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत माळी समाज आणि ओबीसी समाजाचं नेतृत्व केलं. त्यांनी मंडल आंदोलनात शिवसेनेला मोठा धक्का देत 18 आमदारांना सोबत घेऊन पक्ष सोडला होता. त्यामुळे त्यावेळी त्यांची राजकीय ताकद दिसून आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp