छगन भुजबळ घेणार मंत्रिपदाची शपथ, कुणाला बसणार धक्का? राजकीय घडामोडींचा अर्थ काय?
राजभवनात या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. भुजबळ मंत्रिमंडळात सामील झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ मंत्री होणार

मुंबईमध्ये हालचालींना वेग, राजभवनात काय सुरूय?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. आज (20 मे रोजी) सकाळी 10 वाजता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार अशी माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक महत्वाचे नेते आहेत. मंगळवारी सकाळी 10 वाजता ते राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात भुजबळांचाही समावेश केला जाणार आहे.
हे ही वाचा >> ज्योती मल्होत्राच्या तीर्थयात्रेमुळं भारताची सुरक्षा व्यवस्था आली धोक्यात? बैसाखी यात्रेत काय घडलं? वाचा Inside Story
यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, "मला सांगण्यात आलं आहे की, मला राज्य मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाईल. मंगळवारी सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा होईल." धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या खात्याची जागा छगन भुजबळ यांना दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राजभवनात या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. भुजबळ मंत्रिमंडळात सामील झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सर्वांचंच लक्ष या संभाव्य शपथविधी सोहळ्यावर लागून आहे.
हे ही वाचा >> Mumbai COVID-19 Death: मुंबईत पुन्हा कोरोना आला.. दोघांचा मृत्यू? खरं काय ते समजून घ्या!
दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबर 2024 मध्ये मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान छगन भुजबळ यांचा समावेश न केल्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी आग्रह धरला होता, पण काही कारणांमुळे त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलं नाही. छगन भुजबळ यांनीच हा दावा केला होता. त्यांची नाराजी पक्षात आणि ओबीसी समुदायात चर्चेचा विषय बनली होती.
बीडमध्ये घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आणि प्रकृतीचं कारण देत धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे ओबीसी समाजात मोठी नाराजी असल्याची चर्चा होती. मात्र, दुसरीकडे छगन भुजबळ यांच्यासारखा बडा नेता सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर आता धनंजय मुंडे यांचं स्थान धोक्यात येणार का असाल सवाल उपस्थित केला जातोय.