Renu Sinha Murder : 5 कोटीची डील अन् IRS ऑफिसर… वकिलाच्या हत्येची Inside Story

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

C Lawyer renu sinha murder case former office nitin sinha revealed the murder story noida uttar pradesh
C Lawyer renu sinha murder case former office nitin sinha revealed the murder story noida uttar pradesh
social share
google news

Renu Sinha Murder Noida Uttar Pradesh : उत्तरप्रदेशच्या नोएडासर्वोच्च न्यायालयाच्या वकील रेणू सिन्हा (61) (Renu Sinha) यांची त्यांच्याच बंगल्यात निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना घडली होती. या हत्याप्रकरणात आता नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात एका आयआरएस (IRS) ऑफिसरला अटक केली आहे. या ऑफिसरचे नाव नितीन सिन्हा (Nitin Sinha) आहे. हा आयआरएस (IRS) ऑफिसर दुसरा तिसरा कुणी नसून रेणू सिन्हा यांचा नवरा आहे. त्यामुळे आता पती नितीन सिन्हा यांने रेणू सिन्हा यांची हत्या का केली? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे रेणू सिन्हा यांच्या हत्येची इनसाईड स्टोरी काय आहे? ती जाणून घेऊयात. (renu sinha murder case former office nitin sinha revealed the murder story noida uttar pradesh)

नोएडाच्या सेक्टर 30 मधील डी40 बंगल्यात राहणाऱ्या रेणू सिन्हा या सर्वोच्च न्यायालयात वकील होत्या. रेणू सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टीस करत होत्या. दरम्यान रेणू या तिच्या बहिणीशी खूप जवळ होत्या. त्यांचे दररोज फोनवर बोलणी होत असायची. त्या दिवशी रेणू यांची बहिण त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र रेणू या फोनच उचलत नव्हत्या. त्यामुळे बहिणीने रेणूच्या नवऱ्याला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने देखील फोन उचलला नाही. त्यामुळे रेणूने बहिणीच्या काळजीपोटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ रेणूच्या बंगल्यावर दाखल झाले.यावेळी बंगल्याच्या तपासणीत बाथरूममध्ये रेणूचा मृतेदह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. रेणूवर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले होते. यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. हा संपूर्ण प्रसंग पाहून कुटुंबियांना देखील हादरा बसला होता. पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता.

हे ही वाचा : pusesawali satara : पुसेसावळीत हिंसेंची धग कायम! पोलिसांनी कुणाला ठोकल्या बेड्या?

घटनास्थळावरून पती गायब

रेणू सिन्हा या नोएडातील बंगल्यात नितीन सिन्हा यांच्यासोबत राहत होत्या. नितीन सिन्हा हे 1988 बॅचचे आयआरएस अधिकारी होते.पण 1998 मध्ये त्यांनी व्हिआरएस घेतली होती. नितीन आणि रेणू यांना एक मुलगा देखील होता, जो विदेशात राहायचा आणि आर्थिक विश्लेषणाचे काम करायचा. रेणू सिन्हा यांना कॅन्सर सारखा गंभीर आजार देखील झाला होता. मात्र त्यांनी हार न मारता कॅन्सरवर देखील मात केली होती. महिन्याभरापूर्वी त्यांनी कॅन्सरला हरवून नवीन आयुष्य सुरु केले होते. त्या खूप खूश देखील होत्या, मात्र पुढे असं काही होईल अशी त्यांना पुसटशी कल्पना देखील नव्हती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रेणू सिन्हा यांच्या हत्येदरम्यान पती नितीन सिन्हा मात्र गायब होता. त्यामुळे संशयाची सुई नितीन सिन्हावरच जात होती. तसेच रेणूच्या कुटुंबियांनी देखीव नितीनवरच हत्येचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी नितीन सिन्हाचा शोध सुरु केला. पोलिसांनी बंगल्यात लावलेले सीसीटीव्हीही तपासले. या सीसीटीव्हीत नितीन सिन्हा बंगल्यातून बाहेरच पडताना दिसले नव्हते. पोलिसांनी साधारण दोन दिवस सीसीटीव्ही तपासले असता, सोमवारी पहाटे 3 वाजता नितीन सिन्हा घटनास्थळावर दिसून आले. खरं तर नितीन हा बंगल्याच्या स्टोररूममध्ये लपला होता. आणि बंगल्यातून बाहेर पडताच पोलिसांनी त्यांना अटक केली.

हे ही वाचा : Maratha Reservation : संजय राऊत संतापले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

प्रॉपर्टीवरून सुरू होता वाद

नितीन सिन्हाला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली. या चौकशीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. रेणू आणि नितीन सिन्हामध्ये प्रॉपर्टीवरून वाद सुरू होते. नितीनला त्यांचा बंगला 5 करोड 70 लाखांना विकायचा होता. मात्र याला रेणूचा विरोध होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होते. या वादातून धारदार शस्त्राने नितीनने रेणूची हत्या केली होती. त्यानंतर नितीन सिन्हा बंगल्याच्या स्टोअररूममध्ये जाऊन लपला होता. त्यानंतर रात्री स्टोअररूममधून बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलीय

ADVERTISEMENT

डीसीपी हरीश चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनूसार, एक स्थानिक एजंट एका बड्या पार्टीला नितीन सिन्हा यांचा बंगला दाखवायला घेऊन आला होता. तत्पुर्वीच त्याने रेणूची हत्या केली होती. यावेळी नितीन सिन्हाने पार्टीला बंगल्याचा वरचा हिस्सा दाखवला नाही.कारण त्याठिकाणी त्यांनी रेणूचा मृतदेह ठेवला होता. तसेच या बंगल्याची 5 कोटीच्या वर डील ठरली होती. या डीलसाठी त्यांनी 50 लाख अडवान्स देखील घेतले होते.

ADVERTISEMENT

दरम्यान या हत्या प्रकरणात आता रेणू सिन्हा यांच्या भावाच्या तक्रारीवरून त्यांनी नितीन सिन्हा यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आता या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT