बायकोला प्रियकरासोबत दारू पिताना पकडलं, संतापलेल्या नवऱ्याने….काय घडलं?

मुंबई तक

पत्नी आपल्या बॉयफ्रेंडसोबत दारु पित बसल्याचे पाहून नवऱ्याचा राग अनावर झाला आणि त्याने थेट तिच्या बॉयफ्रेंडच्या डोक्यावरच वार केला, त्या हल्ल्यात तो जागीच ठार झाला आणि त्याची पत्नी फरार झाली.

ADVERTISEMENT

Seeing the wife drinking alcohol with her boyfriend husband killed the boyfriend
Seeing the wife drinking alcohol with her boyfriend husband killed the boyfriend
Google CTA

Murder Case: कोणत्याही अनैतिक संबंधांचे परिणाम हे बहुतांशी रक्तरंजितच असतात. त्यामुळे असाच एक प्रकार हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात घडला आहे.  येथे एक महिला तिच्या कुस्तीपटू असलेल्या बॉयफ्रेंडसोबत (Boyfriend) तिच्याच घरात दारूची पार्टी करत होती. त्याची वेळी तिचा नवरा घरी आला. त्यावेळी त्याने आपल्या बायकोकडे जेवण मागितले असता तिच्या बॉयफ्रेंडने हस्तक्षेप केला. त्यावरून त्या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात तिच्या नवऱ्याने पैलवान असलेल्या बॉयफ्रेंडची काठीने मारहाण करून त्याची हत्या केली. त्यानंतर ज्याने हल्ला केला तो मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना घडल्यानंतर मात्र पत्नी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बॉयफ्रेंडचा मृतदेह

पोलिसांनी सांगितले की, आठवडाभरापूर्वी झालेल्या या हत्येचा खुलासा करताना त्यांनी सांगितले की, याप्रकरणी आता हल्ला करणाऱ्या नवऱ्याला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. त्या घटनेनंतर आरोपी पती हा घरीच होता, तर तिथेच पत्नीच्या बॉयफ्रेंडचा मृतदेह घरीच पडून होता. तर हा घडलेला प्रकार पाहून पत्नी फरार झाली होती.

हे ही वाचा >> हवी होती मुलगी.. पण तिसरा मुलगा होताच बापाने घेतला चिमुकल्याचा जीव

लोकेशन ट्रेस

या प्रकरणातील पत्नी घटना घडून गेल्यानंतर पळून गेली होती. त्यामुळे पोलिसांना या घटनेचा तपास करताना अडचणी जाणवत होत्या. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून पत्नीला चालत्या ट्रेनमधून ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी सांगितले की, पत्नी एक्स्प्रेस ट्रेनने पळून गेली होती मात्र पोलिसांनी लोकेशन ट्रेस करून तिला ताब्यात घेतले.