Dombivli Crime: बापानेच केली 10 वर्षाच्या मुलीची क्रूर हत्या, कारण…
Dombivli daughter Murder: डोंबिवलीत एका 10 वर्षाच्या मुलीची तिच्या वडिलांनीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्याप्रकरणी आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
Dombivli 10 Year old Girl Murder: डोंबिवली: डोंबिवलीत (Dombivli) मानपाडा गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दारुड्या बापाने (Father) आपल्याच 10 वर्षीय गतिमंद मुलीची (Daughter) ओढणीने गळा आवळून हत्या (Murder) केली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत फरार बापाला अटक केली. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. (shocking incident in dombivli drunken father kills 10 year old girl father commits gruesome act due to daughters illness)
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची आई लिलावती अग्रहरी हिच्या तक्रारीवरुन पती मनोज अग्रहरी (वय 35 वर्ष) विरुध्द मानपाडा पोलिसांनी खुनाचा गु्न्हा दाखल केला आहे. अग्रहरी कुटुंब एकदम गरीब कुटुंब आहे. तक्रारदार लिलावती यांना चार मुली आहेत. त्यातून दोन नंबरची मुलगी गतीमंद होती, गतिमंद मुलीवर ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तर दोन मुली या मजुरीची कामे करतात. वडील मनोज हा दारुड्या असून डोंबिवलीत एका किरणा दुकानात तो कामगार म्हणून काम करत होता.
दारू पिऊन आल्यावर मनोज नेहमी पत्नी आणि दोन मुलींसह गतिमंद मुलीलाही मारहाण करायचा. या गतिमंद मुलीचा आपल्याला काही उपयोग नाही. तिला मरावेच लागेल, असं तो नेहमी बोलायचा. पण इतर दोन मुलींसह गतिमंद मुलीच्या संगोपनाकडे आईचे पूर्ण लक्ष असायचे. दुपारच्या वेळेत मुलीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याने ती कामावरुन काही वेळासाठी घरी देखील यायची आणि पुन्हा कामावर जात होती.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Amravati Crime: सासू, बायकोच्या भावाला जिवंत जाळलं; जावयाने का केलं सैतानी कृत्य?
दरम्यान, रविवारी (24 सप्टेंबर) संध्याकाळी मनोज नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने दारुच्या नशेत गतिमंद मुलीची ओढणीने गळा आवळून हत्या केली. मुलीची हत्या करून मनोजने तिथून पळ काढला होता.
मात्र शेजाऱ्यांना या घटनेची कुणकुण लागली, तर मनोज हा पत्नी काम करत असलेल्या एमआयडीसीतील कामाच्या ठिकाणी गेला. तर तेथील कर्मचाऱ्यांना पत्नी लिलावती हिला तातडीने घरी जाण्यास सांगितलं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> पंकजा मुंडेंना मोठा धक्का! वैद्यनाथ साखर कारखान्यावर कारवाई, 19 कोटींची…
कर्मचाऱ्यांनी मुलीची आई लिलावतीला तिच्या पतीने केलेल्या प्रकाराबाबत तात्काळ माहिती दिली. हे ऐकून लिलावतीने तातडीने घरी धाव घेतली. तेव्हा मुलगी बिछान्यावर निपचित पडली होती. पती मनोजने यानेच आपल्या गतिमंद मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा लिलावतीने संशय व्यक्त केला. ज्यानंतर लिलावतीने पती मनोज अग्रहरी विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
ADVERTISEMENT
याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत फरार बापाला अटक केली, पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम चोपडे यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT