Crime : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात व्यावसायिकाला संपवलं, भररस्त्यात तलवारीने वार करून हत्या
कारने ओवळा येथील विहंग व्हॅली चौकात आले असता, भूषण काही कामानिमित्त कारमधून खाली उतरला होता.याच दरम्यान अचानक बाईकवरून दोन अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी धारदार तलवारीने सतीश यांची हत्या केली.
ADVERTISEMENT
Thane Crime News : ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत भररस्त्यात एका व्यावसायिकाची धारदार शस्त्राने तलवारीने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सतीश पाटील असे हत्या झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. ठाण्याच्या घोडबंदर कासारवडवली भागात ही घटना घडली आहे. या घटनेने ठाण्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका कर सल्लागाराला (Tax Consultant)अटक केली आहे. आता या कर सल्लागाराने व्यावसायिकाची हत्या का केली? हे जाणून घेऊयात. (thane crime news businessman killed with sword kasarvadavali ghodbunder crime news)
ADVERTISEMENT
व्यावसायिक सतीश पाटील शनिवारी रात्री त्यांच्या कारने ओवळा भागात जात होते. यावेळी सतीष पाटील यांच्यासोबत कर सल्लागार भूषण पाटील आणि नितीन पाटील हे दोघे होते. दरम्यान कारने ओवळा येथील विहंग व्हॅली चौकात आले असता, भूषण काही कामानिमित्त कारमधून खाली उतरला होता.याच दरम्यान अचानक बाईकवरून दोन अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी धारदार तलवारीने सतीश यांची हत्या केली. यावेळी सतीश यांच्यासोबत असलेल्या नितीनला काहीच झाले नाही, तर भूषण या हल्ल्यात किरकोळ जखमी झाला होता.
हे ही वाचा : Article 370 Verdict : सुप्रीम कोर्टाने निर्णय ठरवला वैध; पंतप्रधान मोदी म्हणाले, “हा निर्णय…”
या सशस्त्र हल्ल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सूरू केला होता. यावेळी पोलिसांनी सतीश पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टममार्टमसाठी पाठवला होता. या सशस्त्र हल्ल्यात फक्त सतीश पाटील यांचीच हत्या करण्यात आली होती. तर सतीश यांच्यासोबत असलेले इतर दोघे किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे पोलिसांना या दोघांवरच संशय बळावला होता.
हे वाचलं का?
त्यामुळे पोलिसांनी संशयावरून कर सल्लागार भूषण पाटीलची चौकशी करायला सुरूवात केली. या चौकशीत सुरुवातीला भूषण पाटीलने पोलिसांना तपासात चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर पोलिसांनी खाकीचा धाक दाखवताच भूषण पाटीलने हत्येची कबूली दिली. भूषण पाटीलने व्यावसायिक सतीश पाटील यांच्याकडून दीड कोटी रूपये उधारीवर घेतले होते. यानंतर काही महिन्यांनी या उधारीच्या पैशाची सतीश पाटील यांनी भूषण पाटीलकडे मागणी करायला सुरूवात केली. मात्र भूषण पाटील त्याला नेहमी टाळटाळ करत वेगवेगळे बहाणा करायला लागला. खरं तर भूषण पाटीलला हे पैसै द्यायचे नव्हते. त्यामुळे त्याने दोन सूपारी किलरला सतीश पाटीलच्या हत्येची सुपारी देऊन त्याची हत्या केली.
हे ही वाचा : मोदी-शाहांचं पुन्हा धक्कातंत्र! मध्य प्रदेशचे ‘हे’ नवे CM, शिवराज सिंह चौहानांचा पत्ता कट!
या प्रकरणात पोलिसांनी आता भूषण पाटीलला अटक केली आहे. तर त्या दोन आरोपींचा शोध सुरु केला आहे. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT