ठाणे हादरले! चिमुकलीला जंगलात नेले आणि… पाच नराधमांचे थरकाप उडवणारे कृत्य
ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीला 5 निर्जनस्थळी बोलवून तिच्यावर 5 जणांकडून बलात्कार करण्यात आला आहे. त्याप्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी आता कसून चौकशी सुरु केली आहे.
ADVERTISEMENT
Gang Rape : ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. खून, मारामाऱ्या आणि दरोड असे प्रकार घडत असतानाच महिलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. बुधवारी ठाणे (Thane District) जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर घडला आहे. एका अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) सामुहिक बलात्कार केल्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
नराधमांनी डाव साधला
ठाणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांनी बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ही घटना मागील महिन्यात घडली असून शाहपूर तालुक्यातील अघई गावातील गौरालपाडामध्ये घडली आहे.
हे ही वाचा >> Manoj Jarange Patil शिंदे सरकारवर कडाडले! म्हणाले, “आमचे आणखी किती मुडदे पाडायचेत”
जबरदस्तीनं निर्जनस्थळी बोलवलं
अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार कधी घडला त्या घटनेची नेमकी तारीख सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. ही घटना कशी घडली यावर बोलताना पोलिसांनी सांगितले की, ज्या नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. त्यातील एकाने मुलीला निर्जनस्थळी भेटायला बोलवले होते. त्यानंतर त्या ठिकाणी तिच्यावर 5 जणांकडून सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली.
हे वाचलं का?
आरोपींच्या मुसक्या आवळल्या
निर्जनस्थळी बलात्काराची घटना घडल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी तिचा जबाबही नोंदवण्यात आला. पोलिसांनी आता या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा >> रश्मी ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याने शिलगला नवा वाद; ठाकरेंच्या सैनिकांचा शिंदेंवर गंभीर आरोप
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT