15 December 2024 Gold Rate: काय सांगता! मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे भाव पुन्हा गडगडले; 'इतक्या' रुपयांनी झालं स्वस्त

मुंबई तक

Gold Rate Today In India : सोन्याच्या दरात आज रविवारी 15 डिसेंबरला घसरण झाल्याचं समोर आलं आहे. आज सोन्याच्या किंमतीत 900 रुपयांनी घट झाली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या भावात किती रुपयांनी झाली घसरण?

point

मुंबईत 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या भाव काय?

point

सोन्याच्या 1 तोळ्याचा भाव वाचून तुम्हालाही आनंदच होईल

Gold Rate Today In India : सोन्याच्या दरात आज रविवारी 15 डिसेंबरला घसरण झाल्याचं समोर आलं आहे. आज सोन्याच्या किंमतीत 900 रुपयांनी घट झाली आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु, मागील दोन दिवसांपासून सोन्याचे भाव कमी झाल्याचे समोर येत आहे. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 78000 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजारांच्या पुढे आहे.

मार्केट एक्स्पर्टने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या काळात सोनं-चांदीचे भाव वाढणार आहेत. चांदीच्या भावात आज 15 डिसेंबरला घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत चांदी आज एक हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. एक किलोग्रॅम चांदीचे भाव 95500 रुपये झाले आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

दिल्ली 

दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78040 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71550 रुपये झाली आहे. 

मुंबई

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78890 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71400 रुपये झाली आहे.