Ulhasnagar Suicide: बोट तोडल्याची भयंकर घटना… रोहित पवार भाजपवर संतापले

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ulhasnagar nanaware family suicide case man cut off his finger ncp rohit pawar reaction
ulhasnagar nanaware family suicide case man cut off his finger ncp rohit pawar reaction
social share
google news

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये 20 दिवसांपूर्वी ननावरे दाम्पत्याने काही गुंडांना कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेत न्याय मिळत नसल्याने ननावरे यांच्या भावाने ज्या हाताने भाजपला मतदान केले होते. त्याच हाताचे बोट कापून सरकारला पाठवले आहे. असे प्रत्येक आठवड्याला शरीराचा एक-एक भाग भेट म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पाठवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या सर्व प्रकरणावर आता राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बोट न तोडता आगामी निवडणूकीत योग्य पक्षालाच मत द्या, असा सल्लाच रोहित पवार यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. तसेच रोहित पवार यांनी भाजप कार्यकर्त्याला न्याय द्यावा अशी मागणी सरकारकडे केली आहे. (ulhasnagar nanaware family suicide case man cut off his finger ncp rohit pawar reaction)

रोहित पवार यांचे ट्विट

उल्हासनगरमध्ये भाजप कार्यकर्त्याला न्याय मिळत नसल्याने त्याने ज्या हाताने भाजपला मतदान केले होते, त्याच हाताचे बोट छाटून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले होते. या सर्व प्रकरणावर आता राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना खूपच भयानक आहे!…असं करू नका बाबांनो, असा सल्ला रोहित पवार यांनी कार्यकर्त्याला दिली आहे. यासोबत भाजपचा सत्तेतून कडेलोट करण्याची आज गरज आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत बोट न तोडता, योग्य पक्षालाच मत द्या, असे आवाहन रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. रोहित पवार यांनी या कार्यकर्त्याला न्याय द्या,अशी मागणी देखील सरकारला केली आहे.

हे ही वाचा : BJP: ‘उद्धव ठाकरे अहंकाराच्या नशेत झिंगून…’ देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर बावनकुळे प्रचंड संतापले!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय आहे प्रकरण ?

उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील अशेलेपाडा परिसरात नंदकुमार ननावरे हे कुटुंबासह राहत होते. सुमारे 20 दिवसांपूर्वी ननावरे यांनी पत्नीसह बंगल्याच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली होती. ननावरे यांच्या पत्नीचे नाव उर्मिला आहे. आत्महत्येनंतर काही दिवसांनी, एक व्हिडीओ समोर आला. ज्यामध्ये ननावरे यांनी सांगितले की, काही गुंड त्याला त्रास देत होते, म्हणून आम्ही आत्महत्या करत आहोत.

नंदकुमार ननावरे हे यापूर्वी माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर गेली काही महिने ते अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते. मात्र या घटनेनंतर डॉ. ननावरे हे आपले स्वीय सहाय्यक नसल्याचे बालाजी किणीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा :  Nitin Gadkari: ‘गडकरींसोबत मी नक्कीच उभा राहीन’, रोहित पवारांच्या ‘त्या’ आरोपांमुळे मोठी खळबळ

आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी आपल्या मोबाइलमध्ये एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या संग्राम निकाळजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख आणि नितीन देशमुख या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी नंदकुमार ननावरे यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता त्यांच्या पँटच्या खिश्यात एक चिट्ठीही मिळाली होती. फिर्यादीत व्हिडीओ आणि चिठ्ठीच्या आधारे गुन्हा दाखल करीत असल्याचे म्हटले असतानाही रणजितसिंह निंबाळकर, ज्ञानेश्वर देशमुख, नितीन देशमुख यांची थेट आरोपी म्हणून नावे न टाकता त्यांना सरंक्षण दिले असल्याची खंत नंदकुमार ननावरे यांचा भाऊ धनंजय ननावरे यांनी व्यक्त केली होती.

सदरच्या गुन्ह्याचा तपास हा विठ्ठलवाडी पोलिसांकडून काढून घेत गुन्हे शाखेला दिला आहे. धनंजय ननावरे हे मागील आठवड्याभरापासून खंडणी विभागातील तपास अधिकाऱ्यांची भेट घेत फॉलअप घेत आहेत. मात्र त्यांना पोलिस अधिकाऱ्यांकडून योग्य ती उत्तर मिळत नसल्याने अखेर धनंजय ननावरे यांनी त्यांच्या हाताचे बोट कापत ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट पाठवले आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक आठवड्याला शरीराचा एक भाग भेट करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच मोदी सरकारला ह्याच बोटाने मतदान केल्याचे प्रायश्चित म्हणून पहिला अवयव बोट म्हणून पाठवत असल्याचे धनंजय ननावरे याने व्हिडीओमध्ये म्हटले आहे. या घटनेवर संताप व्यक्त होत असून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया समोर येत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT