आधी डोळे काढले मग जीभ कापली नंतर प्रायव्हेट पार्ट…,महिलेला पिशाच्चसारखं छळलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

woman brutally murdered with weapon khagaria bihar crime story
woman brutally murdered with weapon khagaria bihar crime story
social share
google news

बिहारच्या (Bihar) खगडीया परीसरातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका 45 वर्षीय महिलेची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी क्रुरतेचा कळस गाठत महिलेचे (Women) सुरुवातीला डोळे काढले, त्यानंतर तिची जीभ कापून प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला.या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. सुलेखा देवी असे या मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी (Police) एका आरोपीला अटक केली आहे, तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.(woman brutally murdered with weapon khagaria bihar crime story)

ADVERTISEMENT

बहियार गावच्या पसराहा पोलीस ठाणे हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. 45 वर्षीय सुलेखा देवी या शेतीचे काम करण्यासाठी शेतात गेल्या होत्या. या दरम्यान 4 आरोपींनी मिळून शेतातच महिलेची निर्घृणपणे हत्या केली. आरोपींनी सुरुवातीला महिलेचे डोळे काढले, नंतर तिची जीभ कापली.इतक्यावर आरोपी थांबले नाहीत तर त्यांनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टवरही हल्ला केला. या हल्ल्यानंतर महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली होती.

जुन्या वादातून हत्या

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 गुंठा जमीनीवरून मृत महिलेचा शेजाऱ्यांशी वाद सुरु होता. याच वादातून याआधी 9 वर्षापुर्वी एक हत्याकांड घडलं होते. 25 एप्रिल 2014 ला मृत महिलेचा पती बबलू सिंह आणि तिच्या दीराची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातील एक आरोपी नुकताच जेलमधून बाहेर आला होता. याच आरोपीने महिलेची हत्या करून बदला घेतल्याचा संशय व्यक्त होतोय.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Mumbai Crime : रिक्षाचालकाचा महिलेवर बलात्कार, पोलीस पोहोचले ‘युपी’मध्ये

महिलेच्या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. या घटनेविरोधात आरोपींना लवकरात लवकर गजाआड करण्यासाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून नेशनल हायवे 31 अडवून ठेवला होता. त्यामुळे पुर्णिमा महेशखूंट राष्ट्रीय मार्ग तासभर ठप्प होता. या घटनेची माहिती गोगरी एसडीपीओचे मनोज कुमार यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत परीस्थिती पुर्व पदावर आणली होती. मनोज कुमार यांनी आंदोलनकर्त्यांना आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले होते.

या प्रकरणात चार आरोपींनी मिळून हे हत्याकांड घडवल्याची माहिती आहे.या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीली अटक केली आहे, तर अद्याप इतर आरोपींचा शोध सुरु आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : काकाच्या कृत्याने मुंबईत खळबळ! पुतणीवर अनैसर्गिक अत्याचार, दिले चटके

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT