Crime : पत्नीने दारू पिण्यापासून रोखले, संतापलेल्या पतीने…

मुंबई तक

ADVERTISEMENT

wife did not let husband drink alcohol brutally beaten by father-in-law
wife did not let husband drink alcohol brutally beaten by father-in-law
social share
google news

बीड (Beed) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीला दारू पिण्यास जाऊ न दिल्याने सासरा आणि पतीने मिळून सुनेला बेदम मारहाण केल्याची दुदैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर सुनेने पोलिस ठाण्यात सासरे आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेची चर्चा संपूर्ण जिल्हयात रंगली आहे. (wife did not let husband drink alcohol brutally beaten by father-in-law and husband beed crime story)

वडिलांनी मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे असे नेहमी बोलले जाते, मात्र या घटनेत वडिलच मुलाला दारूच्या आहारी नेतायत. या घटनेत घरातली सुन त्याच्या नवऱ्याला दारू पिण्यास जाऊ देत नाही. सुनेच्या या कृतीला सासरे विरोध करतात आणि तिला बेदम मारहाण करतात, सासऱ्यानंतर पती देखील बायकोला चापटा बुक्क्यांनी मारहाण करतो. या प्रकरणी सुन पोलीस ठाण्यात धाव घेते. हा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातल्या जवळगाव मध्ये समोर आला आहे.

हे ही वाचा : लग्न केलं पण शारीरिक संबंधच ठेवले नाही, वैतागलेल्या बायकोने…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बायको मीना सुंदर ढावरे (रा. जवळगाव, ता. अंबाजोगाई, बीड) हिने पती सुंदर ढावरे यांनीा दारू पिण्यासाठी जाताना रोखले होते. याचा राग मनात धरून पतीने तिला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यासोबतच सासरा सुधाकर ढावरे याने हातातील दगडाने मारून जखमी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप सुनेने केला. सुन मीना ढावरे यांच्या फिर्यादीवरून नवरा व सासऱ्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे. दरम्यान चक्क दारू पिण्यास मारहाण केल्याने या घटनेची चर्चा होत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : बलात्कार, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पूड.. गर्लफ्रेंडसोबत क्रूरपणाचा कळस

अंड्याची पोळी न बनवल्याने जीवघेणा हल्ला

पती-पत्नीमध्ये शुल्लक कारणावरून नेहमी वाद होत असतात. हे वाद काही दिवसांनी मिटतात. यामध्ये कोणाला मध्यस्थी शक्यतो करावी लागत नाही. मात्र बीडमध्ये (Beed) घडलेल्या या घटनेत शुल्लक कारणावरून सुरु झालेला हा वाद थेट पोलीस स्टेशनमध्ये (Police) पोहोचला होता. बायकोने अंड्याची पोळी बनवण्यास नकार दिल्याने संतापलेल्या नवऱ्याने (Husband) तिच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यामुळे या हल्ल्यानंतर बायकोने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची चर्चा संपूर्ण गावात रंगली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT