Loksabha Election 2024 : नारायण राणेंचा ठाकरेंवर जोरदार हल्ला, ''पवारांनी मुख्यमंत्रीपदाच चॉकलेट दाखवलं अन्...'

मुंबई तक

ADVERTISEMENT

narayan rane criticize udhhav thackeray ratnagiri lok sabha election 2024 sharad pawar mahavikas aghadi
ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मंत्रालयात, कार्यालयात ते फक्त दोनच दिवस गेले.
social share
google news

Narayan Rane Criticize Uddhav Thackeray : ''बाळासाहेब म्हणायचे मला सत्ता मिळाली नाही तरी चालेल पण मी हिदुत्वाचा त्याग करणार नाही, पण मुख्यमंत्रीपदाच चॉकलेट दाखवताच ठाकरे शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले आणि त्यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली'', अशी खरमरीत टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)  यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली आहे. (narayan rane criticize udhhav thackeray ratnagiri lok sabha election 2024 sharad pawar mahavikas aghadi) 

ADVERTISEMENT

नारायण राणे रत्नागिरीत बोलत होते.यावेळी नारायण राणे यांनी ठाकरेंवर जोरगार हल्ला चढवला होता. बाळासाहेब म्हणायचे, मला सत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण मी हिदुत्वाचा त्याग करणार नाही. आणि हे उद्धव ठाकरे शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाच चॉकलेट दाखवताच 
त्यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली. शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी ठाकरेंवर केली. ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मंत्रालयात, कार्यालयात ते फक्त दोनच दिवस गेले. काय केलं यांनी महाराष्ट्रासाठी, असा सवाल देखील नारायण राणे यांनी यावेळी केला. 

काँग्रेसचे 50 खासदार आहेत, शरद पवारांकडे  3 आणि उद्धव ठाकरे 5 खासदार आहेत, असे मिळून 58 खासदार होतात आणि आम्ही 303 आहोत.  राहुल गांधी म्हणतो आम्ही सत्तेवर आल्यास 1 लाख रूपये प्रत्येक कुटुंबाला देऊ. पण तु कसा येशील रे बाबा, वण वण भटकतोय ते भटक ना, 50 आहेत ते 51 की 40 होतात आहेत का बघ, असा शब्दात राणेंनी राहुल गांधींना डिवचलं. 

हे वाचलं का?

संविधान बदलाच्या चर्चावरही नारायण राणे यांनी भाष्य केले. ''आता म्हणतायत मोदी संविधान बदलायला निघाले आहेत, कोण बोललो?  मोदी बोलले? अमित शहा बोलले? कोणीही बोललो नाही. मग का खोट सांगताय.बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही दैवत मानतो. मग आम्ही का म्हणून संविधान बदलू. पण काँग्रेसने 65 वर्षाच्या सत्तेमध्ये 80 वेळा घटना बदलली. तेव्हा तुमचं बाबासाहेबांवरच प्रेम कुठं गेलं होतं. हे खोटारडे आहेत,अशी टीका नारायण राणे यांनी विरोधकांवर केली. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT