CM एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची तातडीची पत्रकार परिषद

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या घोषणा!

'पोलीस दलात AI चा वापर करणार. वृद्ध, साहित्यिक आणि कलाकारांना ५ हजारांचं मानधन मिळणार.

विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणार.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायची सरकारची भूमिका आहे.

विशेष अधिवेशन घेऊन आम्ही आरक्षणाचा ठराव मंजूर केला.

ADVERTISEMENT

कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याचं काम सरकार करत आहे.

ADVERTISEMENT

2 कोटी ८० लाख लोकांपर्यंत सर्व्हेक्षणाचं काम झालं आहे.

सगेसोयरे अधिसूचनेवर 8 लाख 47 हजार हरकती आल्या.

आता दिलेलं आरक्षण कोर्टात टिकेल यावर सरकारचा विश्वास आहे.

हरकतींची नोंदणी आणि छाननी करून अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करू.

सरकार आरक्षणावर सकारात्मक आहे, दिलेला शब्द पाळणार.

कायद्याची प्रक्रिया करून 4 महिन्यात आरक्षणावर मार्ग काढू.'

अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिेंदेंनी पत्रकार परिषदेत केल्या आहेत.

 

पाहा LIVE:

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT