Akshay Kumar :अक्षय कुमार भारतीय झाला,आता निवडणूक लढवणार? - Mumbai Tak - akshay kumar got indian citizenship no contest election 2023 bollywood actor independence day 2023 - MumbaiTAK
बातम्या मनोरंजन

Akshay Kumar :अक्षय कुमार भारतीय झाला,आता निवडणूक लढवणार?

नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमार राजकारणात प्रवेश करणार? आगामी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नावर अक्षय कुमार का म्हणाला आहे, हे जाणून घेऊयात.
akshay kumar got indian citizenship no contest election 2023 bollywood actor independence day 2023

Akshay kumar got Indian citizenship : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारला (Akshay kumar) भारताचे नागरिकत्व (Indian citizenship) मिळाले आहे. अक्षयने आज ट्विटरवर एक पोस्ट टाकून याबाबतची माहिती दिली आहे. दिल आणि नागरिकत्व दोन्ही हिंदुस्तानी असल्याचे अक्षयने ट्विटमध्ये म्हटलेय.या ट्विटनंतर आता चाहते त्याला शुभेच्छा देत आहे. यासोबतच नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमार राजकारणात प्रवेश करणार? आगामी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नावर अक्षय कुमार का म्हणाला आहे, हे जाणून घेऊयात.(akshay kumar got indian citizenship no contest election 2023 bollywood actor independence day 2023)

अक्षय कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या जवळ असल्याचा आरोप होत असतो. 2019 च्या लोकसभा निवडणूकीआधी अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक नॉन पॉलिटीकल मुलाखत घेतली होती. या मुलाखतीसह अक्षय कुमारने पंतप्रधान मोदी यांच्या अनेक निर्णयांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे अक्षय कुमारची भाजपशी जवळीकता असल्याची नेहमीच चर्चा रंगत असते. इतकेच नाही भाजप अक्षयचा राजकारणातला प्रवेश घडवून आणू शकतो. त्याला निवडणूकीच्या रिंगणात उतरवू शकतो, अशी चर्चा नेहमीच होत असते. त्यात आता अक्षय कुमारला भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर हा मार्ग आणखीणच सुखर झाला आहे.

हे ही वाचा : PM मोदींची मोठी घोषणा! तुम्हालाही पैसे कमवण्याची संधी? समजून घ्या प्रक्रिया

अक्षय कुमार काय म्हणाला?

अक्षय कुमारने याआधी द लल्लनटापला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने निवडणूकीच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. मला राजकारणात येण्यात रस नाही. मला असे चित्रपट करायचे आहेत, जिथे नागरिक देशासाठी जे करू शकतो ते मी करावे. मला अशी कोणतीही जागा दिसते, जिथे मी काहीतरी करू शकतो. मी स्वतः तिथे जाऊ शकत नाही, मी पैसे पाठवून जे काही करता येईल ते करतो. पण मला राजकारणात रस नाही. मी चित्रपट बनवण्यात आनंदी आहे, असे स्पष्ट उत्तर अक्षय कुमारने दिले होते.

अक्षय कुमारला कॅनडाच्या नागरिकत्वावरून खूप ट्रोल केले जाते. या ट्रोलिंगवर आज तकला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला की, मला खूप वाईट वाटते, जेव्हा लोक माझ्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करतात. मला सर्वात वाईट या गोष्टीचे वाटते की, मला कॅनेडियन कुमार नावाने बोलावले जाते. अक्षय कुमार पुढे म्हणतो की, भारत माझ्यासाठी सर्वकाही आहे. मी जे काही कमवलं आहे, ते भारतात राहून कमावले आहे आणि मी स्वत:ला भााग्यवान समजतो की, मला ती परत करण्याची संधी मिळाली आहे.

अक्षयचे सासरे होते काँग्रेस खासदार

अक्षय कुमारचे सासरे राजेश खन्ना काँग्रेसचे खासदार होते. राजेश खन्ना यांनी 1991 साली नवी दिल्लीतून भाजप नेते लालकृष्ण अडवाणा यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत अडवाणी यांनी 1 हजार 589 मतांनी राजेश खन्ना यांचा पराभव केला होता. या निवडणूकीत अडवाणीने गांधीनगरची निवडणूक जिंकली होती.त्यामुळे त्यांनी नवी दिल्लीची जागा सोडून दिली होती. शेवटी या जागेवर पोटनिवडणूक लागली. या निवडणूकीत भाजपने शत्रुघ्न सिन्हा यांना राजेश खन्ना विरूद्ध उभे केले होते. या पोटनिवडणूकीत राजेश खन्ना विजयी ठरले होते.

हे ही वाचा : Mumbai Crime: वृद्ध दाम्पत्याच्या तोंडाला पट्टी लावली, हात-पाय बांधले…चोरीच्या घटनेनंतर घडली भयंकर घटना

दरम्यान आता अक्षय कुमार निवडणूकीच्या रिंगणात उतरून निवडणूक लढवणार का? याचे उत्तर आगामी काळात समोर येणार आहे.

Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो! Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक! बनला ‘चंदू चायवाला’ पण चमकलं असं नशीब की… Alia Bhatt ने वाढदिवसाला सांगितलं रणबीर कपूरचं सीक्रेट! Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली.. अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष! रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया