Abhishek Bachchan ने ऐश्वर्याला दिलं मोठं सरप्राईज! घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागणार?
Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce Rumours: अभिषेक बच्चनने एक नवीन कोरी कार खरेदी केली आहे. अभिषेकने आपला भाचा अगस्त्य नंदा आणि त्याची मैत्रीण शाहरुख खानची मुलगी सुहाना यांना नव्या कारमधून डिनर डेटला नेले होते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अभिषेक बच्चनने एक नवीन कोरी कार खरेदी केली आहे
नव्या कारसाठी ऐश्वर्या रायच्या आवडीचा क्रमांक घेतला
अभिषेकचा हा निर्णय ऐश्वर्यासाठी सरप्राईज
Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce Rumours: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हे दोघेही घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर घटस्फोटासंबंधित पोस्ट लाईक केल्यानंतर दोघांच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधाण आले होते. त्यात अंबानी कुटुंबियांच्या लग्नात देखील कुटुंब आणि ऐश्वर्या वेगवेगळे स्पॉट झाले होते. त्यामुळे या चर्चांना आणखीण बळ मिळाले होते. त्यात आता एक मोठी बातमी समोर आली आहे. (abhishek bachchan aishwarya rai divorce rumour abhishek gift aishwarya bollywood news)
ADVERTISEMENT
ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अभिषेक बच्चनने एक नवीन कोरी कार खरेदी केली आहे. अभिषेकने आपला भाचा अगस्त्य नंदा आणि त्याची मैत्रीण शाहरुख खानची मुलगी सुहाना यांना नव्या कारमधून डिनर डेटला नेले होते. यावेळी सुहाना आणि अगस्त्य खूपच खूश दिसत होते.
अभिषेकच्या या नव्या कारबाबत सेलिब्रिटी फोटोग्राफर योगेन शाह याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. अभिषेकने आपल्या नव्या कारसाठी ऐश्वर्या रायच्या आवडीचा क्रमांक घेतला आहे. अभिषेकचा हा निर्णय ऐश्वर्यासाठी सरप्राईज असल्याचे म्हटले जात आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Anil Deshmukh : फडणवीसांना देशमुखांचे थेट चॅलेंज, ''माझ्याविरोधातील व्हिडिओ क्लिप्स जगजाहीर कराव्या''
पोस्टमध्ये काय?
अभिषेक बच्चनची नवी कार ही ब्लॅक कलरची आहे. या कारच्या नंबर प्लेटवरील शेवटचे चार अंक 5050 आहे. हा क्रमांक ऐश्वर्यांच्या आवडीचा आहे. याआधी अभिषेक आणि ऐश्वर्याच्या व्हाईट कलरच्या 'मर्सिडीज बेंझ एस क्लास' या कारच्या नंबरप्लेटमध्येही 5050 समाविष्ट होता. या कारची विक्री करण्यात आली आहे. त्यामुळे या कारच्या नंबरवरून आता दोघांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान 20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक आणि ऐश्वर्या विवाहबंधनात अडकले होते. 2011 मध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. आता दोघांच्या लग्नाला 17 वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यानंतर दोघेही विभक्त होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Shyam Manav : फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे श्याम मानव कोण?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT