Mumbai Tak /बातम्या / Bheed : कोरोना, भूक अन् असहायतेची भयंकर कहाणी; ट्रेलर पाहिलात का?
बातम्या बॉलिवूड

Bheed : कोरोना, भूक अन् असहायतेची भयंकर कहाणी; ट्रेलर पाहिलात का?

मुंबई : लॉकडाऊन… या एका शब्दाचं नाव जरी कानावर पडलं तरी अंगावर काटा उभा राहतो. या काळात अनेकांच्या डोक्यावरील छप्पर गेलं. अनेक जणांच्या हातचं काम सुटलं. शहरच्या शहर ओसाड पडली. सर्वसामान्य लोकांना दोनवेळेच्या अन्नाची भ्रांत पडली होती. मजूर काम करणारे अनेक परराज्यातील नागरीक रस्त्याने पायी घराकडे परताना दिसले. दरम्यान, लॉकडाउन काळातील हे भयाण वास्तव आता ‘भीड’ (‘Bheed’) या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. (‘Bheed’, the story of the same helpless people is seen in these pictures.)

‘आर्टिकल १५’, ‘अनेक’, ‘मुल्क’, ‘थप्पड’ अशा वेगळ्या धाटणीचे, कधी सामाजिक आशयावर तर कधी रोखठोक वास्तवावर आशय-विषयाची मांडणी असलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक ‘अनुभव सिन्हा’ यांनी ‘भीड’चे दिग्दर्शन केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तर चित्रपट येत्या २४ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या लॉकडाउनच्या घोषणा अंगावर काटा आणते आणि त्यानंतर हळूहळू या कथेची दाहकता प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.

भीडमध्ये एका पत्रकाराची भूमिका साकारत असलेल्या कृतिका कामरा यांचा एक संवाद आहे- ‘मला भारताची फाळणी झाल्यासारखी वाटते’. एके दिवशी अचानक या लोकांना कळले की ते जिथे राहत होते तिथे त्यांची घरे नाहीत. या संवादातून अनुभव सिन्हा यांची ‘भीड’ची कथा सांगण्याची दृष्टी दिसते.

Sangli : ‘आधी जात, मग खत…’; सरकारच्या अजब कारभारानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड

या ट्रेलरमध्ये कोरोनाचा सामना करत घरोघरी भटकणाऱ्या लोकांच्या कथा दाखवण्यात आल्या आहेत. वडिलांसोबत एक मुलगी सायकल चालवत आहे. दूध किंवा पेट्रोल वाहतूक करण्यासाठी बनवलेल्या टँकरमध्ये एक माणूस लपला आहे. एक कुटुंब ट्रॉली बॅगमध्ये आपले सामान रस्त्यावर ओढत आहे आणि एक लहान मूल बॅगवर झोपलेलं आहे. ट्रेलरमध्ये एका प्रसंगात ‘कोरोना आणि ‘तबलीघी जमात’ ऐकून तुम्हाला महामारीच्या काळात चर्चेत असलेल्या आणखी एका प्रकरणाची आठवणही होते.

NCP च्या नेत्याकडून सुप्रिया सुळेंचा विश्वासघात?, ‘तो’ किस्सा चर्चेत

चित्रपट असणार ब्लॅंक अँड व्हाईट :

दरम्यान, हा संपूर्ण चित्रपट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपटात अभिनेता राजकुमार राव हा एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. तर भूमी पेडणेकर, दिया मिर्झा यांचीही मुख्य भूमिका आहेत. याबरोबरच पंकज कपूर, आशुतोष राणा, विरेन्द्र सक्सेनासारखे मातब्बर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.

एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव BCCI contract list : रोहित, कोहली ते सूर्यकुमार यादव, कोणत्या खेळाडूला किती पगार?