पारंपारिक नृत्य कला केंद्रात अश्लील पार्टी! संघटनेच्या कार्यकर्त्याने बनवला व्हिडीओ अन्...
छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील एका नावाजलेल्या कला केंद्रात पारंपारिक नृत्याच्या नावाखाली रात्री उशीरा हाय प्रोफाइल पार्टी चालत असल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पारंपारिक नृत्याच्या नावाखाली अश्लील प्रकार

पारंपारिक कला केंद्रात रात्री उशीरा अश्लील पार्टी..

कार्यकर्त्याने बनवला व्हिडीओ अन्...
Obscene party news: छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील पाचोड गावातून पारंपारिक नृत्य सोहळ्याच्या नावाखाली अश्लील प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. एका नावाजलेल्या कला केंद्रात पारंपारिक नृत्याच्या नावाखाली रात्री उशीरा हाय प्रोफाइल पार्टी चालत असल्याची बातमी समोर आली आहे. पारंपारिक कला केंद्रात लाज आणणाऱ्या या प्रकराची पोलिसांनी सुद्धा दखल घेतली. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
पारंपारिक कला केंद्रात अश्लील पार्टी...
खरंतर, पाचोड गावाजवळील थापटी तांडामध्ये असलेलं कुलस्वामिनी कला केंद्र हे पारंपारिक नृत्य समारंभासाठी ओळखलं जातं. याठिकाणी विविध पारंपारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. मात्र, पारंपारिक नृत्याच्या नावाखाली या केंद्रात रात्री उशीरा हाय प्रोफाइल अश्लील डान्स पार्टी चालत होती. या पार्टीमध्ये पुरुष नाचणाऱ्या स्त्रियांसोबत अश्लील कृत्ये करत असल्याचं दिसून आलं.
पार्टीमध्ये नाचताना पुरुषांच्या अश्लील कृत्यांना नाचणाऱ्या स्त्रियांची देखील संमती होती. या पारंपारिक कला केंद्राचं वातावरण अगदी डान्स बारसारखं असलेलं दिसून आलं. नाचताना अगदी उघडपणे कोणतीही लाज न बाळगता दारू दिली जात होती.
हे ही वाचा: आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिंदे गटाच्या आमदाराने घातला राडा, कॅन्टीन व्यवस्थापकाला केली मारहाण
संघटनेच्या कार्यकर्त्याने उचललं पाऊल
यूनिव्हर्सिटीच्या एका संघटनेशी संबंधित असलेल्या महिला कार्यकर्त्याला या घटनेची माहिती मिळाली. या प्रकरणाची माहिती मिळताच ती कार्यकर्ता घटनास्थळी पोहोचली आणि तिने यासंबंधीचे पुरावे गोळा करून पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यांनी यासंदर्भात कोणताच गुन्हा नोंदवला नाही.
हे ही वाचा: मुंबईची खबर: 'सिंदूर' पुलाच्या लोकार्पणाचा मार्ग मोकळा! लवकरच 'या' मार्गावरून वाहतूक सुरू....
संघटनेच्या महिलांनी दिली माहिती...
घटनास्थळी पोलिसांनी कोणतीच औपचारिक कारवाई केली नसल्याची माहिती समोर आली. तरी देखील यूनिव्हर्सिटी संघटनेच्या एका विद्यार्थीनीने या प्रकरणासंदर्भात मोठं पाऊल उचललं आणि तो मुद्दा उचलून धरला. या प्रकरणाचा तिने व्हिडिओ बनवला आणि ती विद्यार्थीनी नाचणाऱ्या महिला जिथे राहत होत्या तिथे गेली. मग, संस्थेतील काही महिलांनी नाचणाऱ्या महिलांच्या कपाटाची झडती घेतली आणि व्हिडिओही बनवला. संघटनेतील महिलांच्या मते, पारंपारिक कला केंद्रात अगदी डान्स बारसारखं वातावरण होतं, तरीदेखील अश्लील पद्धतीन नाचणाऱ्या महिलांवर पोलिसांनी त्यावर कोणतीच कारवाई केली नाही.