Mumbai Tak /बातम्या / Satish Kaushik Death: सतीश कौशिकांसोबत शेवटच्या क्षणी काय-काय झालं?
बातम्या बॉलिवूड मनोरंजन

Satish Kaushik Death: सतीश कौशिकांसोबत शेवटच्या क्षणी काय-काय झालं?

Satish Kaushik last Moments: मुंबई: सतीश कौशिक… (Satish Kaushik) बॉलिवूड (Bollywood) विश्वातील एक चमकता तारा… ज्याने कायमचा निरोप घेतला. आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा तो हसरा चेहरा आता कायमचा काळाच्या पडद्याआड गेला आहे. सतीश कौशिक यांच्या निधनाने (Satish Kaushik Passed away) सर्वांचे डोळे पाणावले आहेत. कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की, या वर्षीची होळी (Holi) ही त्यांची शेवटची होळी असेल. कारण अगदी आदल्या दिवशी त्यांनी मनसोक्तपणे धूळवडीचा आनंद लुटला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. (farmhouse party midnight anxiety then cardiac arrest what happened to satish kaushik in his last moments)

सतीश कौशिक यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले आहे. सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सतीश कौशिक मृत्यू प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं ते आपण या रिपोर्टमध्ये जाणून घेऊया.

सतीश कौशिक यांचे निधन कधी झाले?

सतीश कौशिक यांनी 8 मार्च रोजी मोठ्या थाटामाटात होळी साजरी केली. ते दिल्लीतील बिजवासन येथील फार्महाऊसवर कुटुंबासह होळी साजरी करण्यासाठी आले होते. दिल्लीत होळी साजरी करण्यापूर्वी सतीश कौशिक यांनी 7 मार्च रोजी मुंबईतील शबाना आझमी यांच्या घरी होळी पार्टीत सहभागी झाले होते. या सेलिब्रेशनचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. मुंबई आणि दिल्लीत होळीचा आनंद लुटल्यानंतर 9 मार्च रोजी मध्यरात्री 12.10 वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागताच त्यांनी याबाबत त्यांच्या मॅनेजरला सांगितलं. यानंतर त्यांना तातडीने फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सतीश कौशिक यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्यांचा प्राण गेला होता. सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी त्यांचे जवळचे मित्र अनुपम खेर यांनी दिली.

सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर संध्याकाळी 5 वाजता वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कौशिक यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी नातेवाईक आणि सेलिब्रिटींना रिघ लागली आहे. हे सर्वजण सतीश कौशिक यांना भरल्या डोळ्यांनी निरोप देत आहेत.

Satish Kaushik : फार्महाऊसवर सतीश कौशिक सोबत काय झालं? पोलिसांकडून चौकशी सुरू

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

सतीश कौशिक यांनी मृत्यूपूर्वी दिल्लीतील फार्महाऊसवर पार्टी केली होती. तूर्तास तरी या प्रकरणात दिल्ली पोलिसांना कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आलेली दिसत नाही. मात्र, असं असलं तरीही पोलिसांना प्रत्येक बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत. सतीश कौशिक फार्महाऊसवर कधी पोहोचले, तिथे काय घडले हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. ज्या लोकांनी सतीश यांना रुग्णालयात नेले होते, त्यांचीही पोलीस चौकशी करत आहेत.

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय समोर आले?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दिल्लीतील हरिनगर येथील दीनदयाल रुग्णालयात सतीश कौशिक यांचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे.

प्रेग्नेंट नीना गुप्ताला घातलेली लग्नाची मागणी, सतीश कौशिकांचा ‘तो’ किस्सा

बॉलिवूडवर शोककळा

सतीश कौशिक यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. सतीश कौशिक यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. सतीश कौशिक यांच्या निधनाने बॉलिवूड सेलिब्रिटींनाही मोठा धक्का बसला आहे. अनुपम खेर, अक्षय कुमार, नीना गुप्ता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सतीश कौशिक यांचा शेवटचा चित्रपट

सतीश कौशिक यांचा शेवटचा चित्रपट इमर्जन्सी हा आहे. याचे दिग्दर्शन कंगना राणौतने केले आहे. या चित्रपटात अनुपम खेर आणि कंगना महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. कंगनानेही सतीश कौशिक यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सतीश कौशिकच्या या शेवटच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते वाट पाहत आहेत.

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन; बॉलिवूडवर शोककळा

---------
मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं?