Hrithik Roshan पुन्हा लग्न करणार? काय आहे व्हायरल ट्विटचं सत्य - Mumbai Tak
Mumbai Tak /बॉलिवूड / Hrithik Roshan पुन्हा लग्न करणार? काय आहे व्हायरल ट्विटचं सत्य
बॉलिवूड मनोरंजन

Hrithik Roshan पुन्हा लग्न करणार? काय आहे व्हायरल ट्विटचं सत्य

Hritik Roshan-Saba Azad Marry in November : बॉलिवूडला गेल्या अनेक महिन्यापासून लगीनघाई लागली आहे. नुकताच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता. या दोघांच्या लग्नाची घटना ताजी असताना आता बॉलिवूडच आणखीण एक कपल लग्नबंधनात अडकणार आहे. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. या दोघांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. नेमकी ही तारीख कोणती आहे? हे जाणून घेऊयात. (hritik roshan to marry girlfriend saba azad in november 2023 tweet viral in social media)

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि त्याची गर्लफ्रेड सबा आझाद (Saba Azad) गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघे अनेकदा एकत्र पार्टीत अथवा शोमध्ये स्प़ॉट देखील झाले आहेत. तसेच अनेकदा त्यांनी पापाराजीला पोज देखील दिले आहेत. त्यामुळे बॉलिवूडमध्ये त्यांच्या रिलेशनशीपची चर्चा असते. आता हे दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांच्या लग्नाची माहिती देणारे ट्विट देखील व्हायरल होत आहे.

शाहरूख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत घुसले दोन तरूण

व्हायरल ट्विटमध्ये काय?

सोशल मीडियावर एक ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये हृतिक रोशन (Hritik Roshan) त्याची गर्लफ्रेड सबा आझाद (Saba Azad) सोबत नोव्हेंबर 2023 ला लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे ट्विट एका व्हेरिफाईड अकाऊंटवरून करण्यात आले आहे. मात्र खरंच हे कपल नोव्हेंबर 2023 मध्ये लग्नबंधनात अडकणार याची खात्री होऊ शकली नाही आहे.तसेच या ट्विटवर हृतिक रोशन किंवा गर्लफ्रेड सबा आझादने देखील प्रतिक्रिया दिली नाही आहे. त्यामुळे ते खरंच नोव्हेंबरमध्ये लग्न करणार आहेत की नाही याची पुष्टी होऊ शकली नाही आहे.

दरम्यान हृतिक रोशनने (Hritik Roshan) करण जोहरच्या सितारो से सजे 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत सबा सोबतच्या नात्याबाबतचा खुलासा केला होता. या पार्टीत दोघे हातात हात घालून वावरत होते. या कार्यक्रमानंतर त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आले होते.आता हृतिक रोशन आणि गर्लफ्रेड सबा आझाद (Saba Azad)नोव्हेंबरमध्ये लग्न करणार आहेत की नाही?याबाबत ते स्वत:च खुलासा करतील. या घोषणेची प्रेक्षकांना उत्सुकता असणार आहे.

Hareem Shah: Tiktok स्टारचा MMS लीक, थेट सांगितलं ‘यांनी’ केलं घाणेरडं काम!

हृतिक रोशनच्या (Hritik Roshan) वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर तो बॉलिवूडची मस्तानी दिपिका पदूकोन सिद्धार्थ आनंद फाईटर सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात दिग्गज अभिनेता अनिल कपूर आणि करण सिंह ग्रोवर लीड रोलमध्ये असणार आहेत.हृतिक रोशनच्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता असणार आहे.

वेब सीरीजमधील ‘तो’ गायक ‘जो’ बनला निर्दयी खुनी! IPS पत्नीसोबत IAS पतीची परदेशवारी… दिसतायेत दोघंही लय भारी! Gufi paintal : महाभारतात शकुनी मामा लंगडत का चालायचे? Aditi Rao Hydari घटस्फोटनंतर दुसऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात! थाटणार संसार? Anil Ambani यांची फिल्मी लव्हस्टोरी! जेव्हा कुटुंबाच्या विरोधात गेले तेव्हा… Reham Khan : इम्रान खान यांच्या EX पत्नीचं तिसरं लग्न, पतीसोबत रोमँटिक अंदाज! तुम्हाला ‘या’ सवयी असतील, तर मुलांवर होईल वाईट परिणाम; वेळीच सावध व्हा! फिटनेस फ्रीक Shilpa Shetty मुलांसोबत मस्ती करताना थकली! यूजर्स म्हणाले.. मालदीवमध्ये Rinku Singh चा स्टायलिश लुक! 6 पॅक अ‍ॅब्सवर सर्वांच्या खिळल्या नजरा! Balasore Train Accident : विरेंद्र सेहवाग ‘त्या’ मुलांचा होणार पालक, केली मोठी घोषणा IPL मधून माहीची बक्कळ कमाई; एका सामन्याची फी जाणून व्हाल हैराण! कतरीना कैफची ‘ही’ सवय आवडत नाही, विक्की कौशलचा खुलासा WTC फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, स्टार गोलंदाज बाहेर रेल्वे रूळांमध्ये किंचीत अंतर सोडण्यामागचे कारण काय? बॉक्सऑफिसवर सारा-विकीची हटके जोडी, दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ! Train accidents : ‘या’ अपघातांनी अवघा भारत हादरला होता, तुम्हाला किती माहितीये? एका Video Call मुळे व्यक्तीला 5 कोटींचा गंडा! चुकूनही ‘हे’ नका करू Mukesh Ambani यांची गोंडस नात!.. घेतलं कुशीत; क्यूट Photos Viral तुमचं मूलही मोबाईल असल्याशिवाय जेवत नाही? होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार.. Adah Sharma : ‘नाकाची सर्जरी करून घे’, जेव्हा अभिनेत्रीला दिला होता सल्ला; म्हणाली..