"मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा नाही...", नाना चिडले, हौदात उतरले, नार्वेकरांनी केलं निलंबित
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन नाना पटोले आक्रमक झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचे बाप असतील, शेतकऱ्यांचे बाप नाहीत असं म्हणत नाना पटोले आक्रमक झाले.
ADVERTISEMENT

Nana Patole : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला काल सुरूवात झाली. आजपासून नेहमीप्रमाणे सभागृहात घमासान पाहायला मिळालं. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी आक्रमक होत सभागृहात गेले. यामुळे त्यांना आजच्या दिवसासाठी निलंबित करण्यात आलं आहे.
लोणीकरांच्या वक्तव्यावरुन पटोले आक्रमक
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन नाना पटोले आक्रमक झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचे बाप असतील, शेतकऱ्यांचे बाप नाहीत असं म्हणत नाना पटोले आक्रमक झाले. लोणीकर यांनी केलेला अपमान आता अन्नदाता शेतकरी सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. हे वक्तव्य चालणार नाही, हे वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं पटोले म्हणाले.
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोलेंना ही भाषा तुमच्याकडून असं अपेक्षित नाही म्हणत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावर आक्रमक झालेले नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हौदात उतरले. त्यावेळी राहुल नार्वेकर यांनी कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित केलं.
नाना पटोले दुसऱ्यांदा हौदात, नार्वेकरांची कारवाई
कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोलेंना हे वागणं शोभणीय नसल्याचं म्हटलं. नाना पटोले हे सभागृहाचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. ते जागेवर बसले नाहीत, तर मला पुढची करावाई करावी लागेल असं अध्यक्ष म्हणाले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी अध्यक्षांवर धावून जाणं चुकीचं आहे असं म्हटलं. यावेळी नाना पटोले पुन्हा एकदा हौदात उतरले. त्यावेळी राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना आजच्या दिवसासाठी नाना पटोले यांना निलंबित केलं.