बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खानच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. तर येणाऱ्या नव्या बाळासाठी करिनाप्रमाणे सैफही तयार करतोय. येणाऱ्या बाळासाठी खास सैफ पॅटर्निटी लिव्ह म्हणजेच पितृत्व रजा घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बाळासाठी सैफ पूर्ण सज्ज आहे.
नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सैफने पॅटर्निटी लिव्ह आणि त्याचं महत्त्व सांगितलं. सैफ त्याच्या पहिल्या बाळाच्या जन्मापासून म्हणजेच सारा अली खानच्या जन्मापासून पॅटर्निटी लिव्ह घेतो. सैफ म्हणतो, “लहान बाळ घरी असताना कोणाला काम करायला आवडेल? जर तुम्ही तुमच्या मुलांना मोठं होताना बघत नसाल तर हे चूक आहे. मी माझ्याबाळासोबत खूप वेळ घालवणार आहे.”
तर करिना गरोदरपणातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतंच करीनाने काही फोटो पोस्ट केले होते. ज्या फोटोत ती योगा करताना दिसतेय. करिनाने शेअर केलेल हे फोटो व्हायरल देखील झाले होते. दरम्यान करीना आपल्या दुसऱ्या गरोदरपणाचा अनुभव पुस्तकातून मांडणार आहे.
सैफने 1991 मध्ये अभिनेत्री अमृता सिंग हिच्याशी लग्न केलं होतं. या दोघांनाही सारा आणि अब्राहम अशी दोन मुलं आहे. यानंतर अमृता आणि सैफचा घटस्फोट झाला. तर 2012 मध्ये सैफने अभिनेता करिना कपूरची लग्न केलं. सध्या सैफ अली खान तांडव या वेबसिरीजमध्ये झळकला होता. त्याची ही वेबसिरीज मोठा वादाचा विषय ठरली होती. तर लवकरच तो आदिपुरुष या सिनेमाच्या शूटींगला सुरुवात करणार आहे.