सलमान खानला बॉलिवूडमध्ये ३४ वर्षे पूर्ण, पुन्हा बदललं आगामी सिनेमाचं नाव

मुंबई तक

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला आज फिल्म इंडस्ट्रीचा सुलतान म्हटले जाते. सलमान खानला प्रेक्षकांनी 26 ऑगस्ट 1988 रोजी ‘बीवी हो तो ऐसी’ मधून पहिल्यांदा स्क्रीनवर पाहिले होते. या चित्रपटात सलमान खानची भूमिका खूपच छोटी होती. एका वर्षानंतर 1989 मध्ये ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून त्याने नायकाच्या भूमिकेत पदार्पण केले. अशा परिस्थितीत आता 34 वर्षांनंतर सलमान खान […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला आज फिल्म इंडस्ट्रीचा सुलतान म्हटले जाते. सलमान खानला प्रेक्षकांनी 26 ऑगस्ट 1988 रोजी ‘बीवी हो तो ऐसी’ मधून पहिल्यांदा स्क्रीनवर पाहिले होते. या चित्रपटात सलमान खानची भूमिका खूपच छोटी होती. एका वर्षानंतर 1989 मध्ये ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून त्याने नायकाच्या भूमिकेत पदार्पण केले. अशा परिस्थितीत आता 34 वर्षांनंतर सलमान खान बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉप सुपरस्टार्सपैकी एक मानला जातो. त्याच्या इतक्या वर्षांच्या प्रवासात त्याने भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक हिट आणि सर्वात आयकॉनिक ब्लॉकबस्टर दिले आहेत.

सलमानने इंडस्ट्रीत ३४ वर्षे पूर्ण केली आहेत

सलमानच्या चाहत्यांनी #34YearsOfSalmanKhanEra या ट्रेंडसह हा खास प्रसंग साजरा केला आहे. सुपरस्टारने त्याच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. प्रेम आणि समर्थनासाठी सलमानने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यानंतर त्याच्या पुढील चित्रपटाचे नाव जाहीर केले. ‘किसी का भाई, किसी की जान’, असं त्याच्या नवीन चित्रपटाचे नाव आहे.

चाहत्यांसाठी खास पोस्ट

सलमानने व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, “34 साल पहले अब था और 34 साल बाद भी अब है. मेरे जीवन की यात्रा अनजान जगह से शुरू हुई और अब जाकर 2 शब्दों की बन गई है, आज और यहां. मेरे साथ रहने के लिए धन्यवाद . जो अब था और अब मेरे साथ रहने के लिए धन्यवाद. असं म्हणत त्याने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहे.

तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सलमान येतोय मोठ्या पडद्यावर

सलमान खान ‘किसी का भाई…किसी की जान’ या चित्रपटाद्वारे 3 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. असे सांगण्यात येते की हा चित्रपट सलमान खानच्या चित्रपटाकडून अपेक्षित असलेल्या सर्व घटकांनी परिपूर्ण आहे. अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा, रोमान्स आणि उत्तम संगीतने परिपूर्ण असा हा चित्रपट असणार आहे. असे मानले जाते की हा सलमान खानचा ‘कभी ईद कभी दिवाळी’ चित्रपट आहे, ज्याचे नाव बदलण्यात आले आहे. यापूर्वी चित्रपटाचे नाव ‘भाईजान’ असे होते.

नव्या लूकमध्ये दिसणार सलमान

सलमान खान या चित्रपटात नवीन लूकमध्ये दिसणार आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये खांद्यापर्यंत आलेले त्याचे केस त्याचा वेगळा लूक दाखवत आहे. तेरे नाम, सावन, वीर या चित्रपटातून सलमान लांब हेअर स्टाईलमध्ये दिसला होता. त्याच्या तेरे नाममधील आगळ्या-वेगळ्या हेअर स्टाईलची मोठी क्रेज निर्माण झाली होती. त्यानंतर आता त्याच्या या नवीन चित्रपटातून नव्या लूकमध्ये तो दिसणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp