70th National Film Awards winners list: सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता पुरस्कार कुणाला? पहा पूर्ण यादी

मुंबई तक

ADVERTISEMENT

ऋषभ शेट्टी, नित्या मेनन ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री.
७०व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

point

राष्ट्रीय पुरस्कारांची संपूर्ण यादी पहा

point

ऋषभ शेट्टी, नित्या मेनन ठरले सर्वोत्कृष्ट कलाकार

70th national film awards 2024 winners list: भारतीय चित्रपट सृष्टीत अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठीचाही डंका वाजला. त्याचबरोबर बॉक्स ऑफिसवर बक्कल कमाई करणाऱ्या चित्रपटानीही पुरस्कारांवर नाव कोरले. कोणत्या चित्रपटांना पुरस्कार मिळालाय?सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कुणाला मिळाला, पहा संपूर्ण यादी. (70th national film awards 2024 winners ful list) 

ADVERTISEMENT

ऋषभ शेट्टी सर्वोत्कृष्ट अभिनेता

राष्ट्रीय पुरस्कारांवर कांतारा चित्रपटाने आपली छाप सोडली. कांतारा चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा ऋषभ शेट्टी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. तर कांतारा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. ऋषभ शेट्टी हा कांतारा चित्रपटाचा दिग्दर्शकही आहे. सूरज बडजात्याला 'ऊंचाई' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला.

हेही वाचा >> गुलीगत राडा, 'गावठी पॅटर्न' दाखवत सूरज देणार 'बुक्कीत टेंगुळ'! 

अभिनेत्री नित्या मेनन आणि मानसी पारेख यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जाहीर झाला. नित्या मेननला 'तिरुचित्राम्बलम' चित्रपटातील भूमिकेसाठी, तर मानसी पारेखला 'कच्छ एक्स्प्रेस'मधील भूमिकेसाठी हा पुरस्कार देण्यात आला. 

हे वाचलं का?

गुलमोहर ठरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट

ब्रह्मास्त्र चित्रपटातील गाण्यासाठी अरिजीत सिंगला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला. शर्मिला टागोर यांच्या गुलमोहर चित्रपटाने सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट या श्रेणीतील पुरस्कार पटकावला. या चित्रपटात मनोज वायपेयी मुख्य भूमिकेत आहे. केजीएफ 2 चित्रपटाने सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट पुरस्कार मिळवला.

हेही वाचा >> 96 लाख महिलांच्या खात्यात 3000 जमा, तुमच्या बँकेत कधी पोहोचणार? 

70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट अभिनेता -ऋषभ शेट्टी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नित्या मेनन, मानसी पारेख
सर्वोत्कृष्ट चित्रपट - कांतारा
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री -नीना गुप्ता
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता -पवन राज मल्होत्रा 
सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट - अट्टम
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सूरज बडजात्या
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - गुलमोहर
सर्वोत्कृष्ट चित्रिकरण - मोनो नो अवेअर
सर्वोत्कृष्ट संगीत - विशाल शेखर
सर्वोत्कृष्ट स्टंट दिग्दर्शन -केजीएफ २
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट - पोनियन सेल्वन १
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - वाळवी
सर्वोत्कृष्ट पटकथा - आनंद एकार्शी 
सर्वोत्कृष्ट तेलगू चित्रपट - कार्तिकेय २
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट - केजीएफ २
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन - प्रीतम (ब्रह्मास्त्र)
सर्वोत्कृष्ट गीतकार - नौशाद सदर खान (फौजा)
सर्वोत्कृष्ट कथा - मोनो नो अवेअर
सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक - अरिजित सिंग
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक - बॉम्बे जयश्री
स्पेशल इफेक्ट - ब्रह्मास्त्र
साऊंड डिझाइन - पोनियन सेल्वन १
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार - श्रीपत 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT