Ladki Bahin Yojana : 96 लाख महिलांच्या खात्यात 3000 जमा, तुमच्या बँकेत कधी पोहोचणार?
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : बुधवार 14 ऑगस्टपासून हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात हस्तांतरणास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत तब्बल 96 लाख 35 हजार महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा झाले आहेत. येत्या 19 ऑगस्टपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे आजपासून सलग 4 दिवस तुमच्या खात्यात पैसे होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीयेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा होण्यास सुरूवात
येत्या 19 ऑगस्टपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत
पुढील 4 दिवस पैसे हस्तांतरण होण्याची शक्यता
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा होण्यास सुरूवात झाली आहे. बुधवार 14 ऑगस्टपासून हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात हस्तांतरणास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत तब्बल 96 लाख 35 हजार महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा झाले आहेत. येत्या 19 ऑगस्टपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे आजपासून सलग 4 दिवस तुमच्या खात्यात पैसे होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीयेत. त्या महिलांच्या खात्यात पुढील 4 दिवस पैसे हस्तांतरण होण्याची शक्यता आहे. (adki bahin yojana scheme 96 lakh women accont send 3000 dbt tranfer mukhymantri majhi ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar cm eknath shinde)
ADVERTISEMENT
राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या योजनेत किती लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, याचा आकडा सांगितला आहे. आज सकाळपासून 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झाला आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच याआधी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाला आहे. अशाप्रकारे एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे. तर उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत असल्याचा विश्वास देखील आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : Uddhav Thackeray: महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? उद्धव ठाकरेंनी थेट सांगितलं
दरम्यान अद्यापही ज्या पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही आहेत. त्यांच्याजवळ अजून चार दिवसाचा अवधी आहे.त्यामुळे येत्या चार दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मात्र तत्पुर्वी तुमचा अर्ज या योजनेसाठी पात्र ठरवणे आवश्यक आहे. जर अजूनही तुमचा अर्ज सबमिटेड दाखवत असेल तर तुम्हाला तुमचा अर्ज अप्रुव्ह होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. तसेच सरकार फक्त 19 तारखेपर्यंतच पैसै पाठवणार नाही आहे. कदाचित ही मुदत वाढण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
तसेच ज्या महिलांनी अर्ज केले आहेत. त्यांनी त्यांचे अर्ज तपासूनही पाहायचे आहे. तुमच्या अर्जावर काही दुरूस्ती सांगण्यात आली आहे. ही दुरूस्ती सांगितली असेल तर त्वरीत ती दुरूस्ती करून अर्ज सबमीट करून घ्या. काही महिलांनी त्यांची कागदपत्रे देखील अपलोड केली नाहीत. काहींनी फोटो देखील व्यवस्थित काढले नाहीत. या महिलांना त्यांच्या अर्जावर दुरूस्तीचा पर्याय सांगितला गेला आहे. त्यामुळे ही दुरूस्ती करून तुम्हाला अर्ज सबमीट करायचं आहे. त्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
हे ही वाचा : Uddhav Thackeray : "आयएएस ऑफिसर म्हणताहेत, साहेब लवकर या", ठाकरे मेळाव्यात काय बोलले?
अनेक महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे इतक्यात त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही आहेत. त्यांचा अर्ज मंजूर व्हायला काहीसा वेळ जाणार आहेत. त्यामुळे त्यांना पैसे खात्यात जमा होण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागणा आहे. तसेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची मुदत 31 ऑगस्ट ठेवली आहेत. मात्र आता ही योजना निरंतर सुरु राहणार आहे. या योजनेसाठी आता कोणतीही मुदत ठेवण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे आता महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT