Bigg Boss Marathi: आज होणार गुलीगत राडा, 'गावठी पॅटर्न' दाखवत सूरज देणार 'बुक्कीत टेंगुळ'!
Suraj Chavan Big Boss Marathi 5 : आज (16 ऑगस्ट) बिग बॉसच्या घरात दुसऱ्या कॅप्टन्सीसाठी गुलीगत राडा होताना पाहायला मिळणार आहे. बुक्कीत टेंगुळ काढणाऱ्या सूरज चव्हाणचं या टास्कदरम्यान नवं रूप पाहायला मिळेल.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
निक्की-अरबाजसोबत सूरज भिडणार, करणार गुलीगत राडा!
"मी लय गावठी पॅटर्न... एकदा सुटलो तर सुटलो"
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी सीझन 5' सध्या चांगलाच गाजत आहे. याची सर्वत्र प्रचंड चर्चा होत आहे. पहिल्या दिवसापासूनच या घरात दंगा आणि राडे होताना पाहायला मिळत आहे. एकापेक्षा एक वरचढ होत रोज आपलं नवीन रूप दाखवत आहेत. अशात आज (16 ऑगस्ट) बिग बॉसच्या घरात दुसऱ्या कॅप्टन्सीसाठी गुलीगत राडा होताना पाहायला मिळणार आहे. बुक्कीत टेंगुळ काढणाऱ्या सूरज चव्हाणचं या टास्कदरम्यान नवं रूप पाहायला मिळेल. (bigg boss marathi season 5 new twist suraj chavan will fight for captaincy task with arbaaz patel and nikki tamboli)
ADVERTISEMENT
नुकताच 'कलर्स मराठी'च्या सोशल मीडिया हँडलवर आजच्या भागाचा प्रोमो शेअर करण्यात आला. यामध्ये सूरज निक्की-अरबाजला भिडताना दिसत आहे. सूरजचं हे रूप पाहायला चाहते खूप उत्सूक झालेले आहेत.
हेही वाचा : Uddhav Thackeray: महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? उद्धव ठाकरेंनी थेट सांगितलं
निक्की-अरबाजसोबत सूरज भिडणार, करणार गुलीगत राडा!
गुलिगत धोका म्हणणाऱ्या सूरज चव्हाणच्या एन्ट्रीने अनेकांनी त्याची टिंगल उडवली होती. आता मात्र, सूरजने सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत. यावेळी कॅप्टन्सीच्या नव्या टास्कमध्ये सूरज 'अँग्री यंग मॅन'चे रौद्र रुप धारण केलेला दिसेल.
हे वाचलं का?
आजच्या एपिसोडचा पहिला प्रोमो समोर आला आहे. यामध्ये सूरज घरातील तगड्या समस्यांना आव्हान देत भिडताना दिसणार आहे. यावेळी तो म्हणताना दिसत आहे की, 'त्याला हाणलं नाही आहे मी अजून... माझं मी बघेन.' असं म्हणतो. हा प्रोमो आता तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा : Uddhav Thackeray : "आयएएस ऑफिसर म्हणताहेत, साहेब लवकर या", ठाकरे मेळाव्यात काय बोलले?
"मी लय गावठी पॅटर्न... एकदा सुटलो तर सुटलो"
कॅप्टन्सी कार्यात सूरज चव्हाण वैभवला नडला आणि आता अरबाजलाही भिडल्याचं दिसत आहे. सूरज चव्हाण म्हणतो की, 'मी लय गावठी पॅटर्न आहे... एकदा सुटलो की सुटलो.' त्यामुळे हा एपिसोड पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना! कांदिवलीच्या शाळेत ११ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग, शिक्षकावर गुन्हा दाखल
तसंच, वर्षा ताई सूरजचं कौतुक करत म्हणतात की, 'तू खूप छान खेळलास.' यावर सूजर म्हणतो की, 'ताई मला तो थांबवत होता मला इतकी चीड यायची ना...' यावर वर्षा उसगांवकर म्हणतात, 'पुढच्या वेळेला काय कर तू बाकी लोक काय बोलतात याकडे लक्ष देऊ नकोस.' सूरज पुढे म्हणतो, 'त्याला (अरबाज) मी फक्त मानेवर उचललंय फक्त सहज... मग माझी किती पावर असेल. मी जर सुटलो तर सुटलो, त्यो मला काय म्हणाला, तुला मी उचलून पाण्यात फेकून दिलं असतं.' मी म्हणालो, 'हे बघ तू पाण्यात फेकशील पण, पाण्यातून बाहेर आल्यावर मी काय करेन हे तुला कळणार नाही. मी लय गावठी पॅटर्न आहे.'
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT