Arbaz Patel : बिग बॉसच्या घरात शिवरायांचा जयघोष टाळला, 'त्या' घटनेवर अरबाज स्पष्टच बोलला, 'धर्माच्या बाबतीत मी...'
Arbaz Patel News : पुरषोत्तम दादा एलिमिनेट झाल्यावर त्यांनी घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला होता. या जयघोषा दरम्यान अरबाज हात बांधलेल्या अवस्थेत घरात उभा असताना दिसला होता. त्यामुळे शिवाजी महाराजांचा जयघोष न केल्याप्रकरणी अरबाज सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला होता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मी कदाचित काहीतरी विचार करत असेन
खरंच मला माहीत नव्हतं की असं काही घडलं
पुरुषोत्तमदादा पाटील यांना मीच नॉमिनेट केलं होतं
Arbaz Patel, Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरातून नुकताच अरबाज पटेल (Arbaz Patel) हा एलिमिनेट झाला आहे. अरबाज एलिमिनेट झाल्यावर निक्की (Nikki Tamboli) ढसाढसा रडली होती. आता तिला एकटीच गेम खेळावा लागणार आहेत. अशात बाहेर आलेला अरबाज सध्या अनेक माध्यमांना मुलाखती देत आहे. या मुलाखती दरम्यान अरबाजने बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) घडलेल्या त्या घटनेवर माफी मागितली आहे. दरम्यान नेमकी ती घटना काय होती? आणि अरबाजने माफी का मागितली? हे जाणून घेऊयात. (bigg boss marathi season 5 arbaz patel apologize for incident chhatrapati shivaji maharaj chanting purshotam patil)
ADVERTISEMENT
खरं तर बिग बॉसच्या पहिल्याच आठवड्यात अरबाजच्या एका कृतीने वाद पेटला होता. पुरषोत्तम दादा एलिमिनेट झाल्यावर त्यांनी घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला होता. या जयघोषा दरम्यान अरबाज हात बांधलेल्या अवस्थेत घरात उभा असताना दिसला होता. त्यामुळे शिवाजी महाराजांचा जयघोष न केल्याप्रकरणी अरबाज सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला होता. तसेच प्रेक्षकांनी तर अरबाजला घराबाहेर काढण्याचा पणच आखला होता.
हे ही वाचा : Bigg Boss Marathi : निक्की रडरड रडली...बिग बॉसने अरबाजला दाखवला बाहेरचा रस्ता
'बिग बॉस'च्या घरातून एक्झिट घेताना पुरुषोत्तमदादा पाटील यांनी माऊलींची प्रार्थना करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयजयकार केला होता. यावेळी सगळे सदस्य हात जोडून उभे होते. पण अरबाज पटेल काहीही न बोलता हाताची घडी घालून उभा होता. त्यावरून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर आता अरबाज पटेल सकाळच्या मुलाखतीत माफी मागितली आहे. तो या घटनेवर काय म्हणाला आहे? हे जाणून घेऊयात.
हे वाचलं का?
अरबाज काय म्हणाला?
''खरंच मला माहीत नव्हतं की असं काही घडलं आहे. कारण मी तसा नाही. मी संभाजीनगरमध्ये राहतो, ते ऐतिहासिक ठिकाण आहे हे सर्वांना माहीत आहे. आपण सगळे शिवाजी महाराजांची मूळं आहोत. ही गोष्ट घडली तेव्हा मी कदाचित काहीतरी विचार करत असेन, कारण मी ऐकलं नाही की नेमकं काय चालू होतं. पुरुषोत्तमदादा पाटील यांना मीच नॉमिनेट केलं होतं.''
हे ही वाचा : Bigg Boss Marathi : 'अरबाजला वाचवण्यासाठी संग्रामचा बळी', 'त्या' आरोपावर चौगुले काय म्हणाला?
माझ्या मनात काही असतं तर मी बिग बॉस मराठीमध्ये आलो नसतो. मी म्हटलं असतं की मराठी बिग बॉस आहे तर मला नाही जायचं. मी तसा व्यक्ती नाही. धर्माच्या बाबतीत मी खूप काळजी घेणारा आणि भावनिकदृष्ट्या संवेदनशील आहे. पण जर कोणालाही चुकीचं वाटलं असेल तर मी क्षमा मागतो. कुणालाही तसं वाटलं असेल तर मी माफी मागतो'', असं अरबाज पटेल म्हणाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT