Bigg Boss Marathi : 'अरबाजला वाचवण्यासाठी संग्रामचा बळी', 'त्या' आरोपावर चौगुले काय म्हणाला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 bigg boss marathi sangram chougule first facebook post after elimination from bigg boss marathi season 5 arbaaz patel
संग्राम चौगुले 14 दिवसातच घराबाहेर पडला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संग्राम चौगुले 14 दिवसातच घराबाहेर पडला

point

दुखापतीमुळे त्याला घराबाहेर पडाव लागलं

point

घराबाहेर पडताच संग्रामची पहिली प्रतिक्रिया

Sangram Chougule Facebook Post : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री मारणारा संग्राम चौगुले 14 दिवसातच घराबाहेर पडला आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला ना घरातली काम करता येत होती. ना टास्कमध्ये सहभाग घेता येत होता. तसेच त्याची दुखापत गंभीर असल्या कारणाने त्याला दोनच आठवड्याच घराचा निरोप घ्यावा लागला. पण अरबाजला वाचवण्यासाठी संग्रामला बाहेर काढण्याचे सूर सोशल मीडियावर उमटतात. यावर आता घराबाहेर पडताच संग्राम चौगुलेने पहिला प्रतिक्रिया दिली आहे. (bigg boss marathi sangram chougule first facebook post after elimination from bigg boss marathi season 5 arbaaz patel) 

ADVERTISEMENT

बिग बॉसच्या घरात शनिवारी एक वेगळाच भाऊचा धक्का रंगला होता. रितेश भाऊ कामानिमित्त बाहेर असल्या कारणाने त्याच्या ऐवजी डॉ. निलेश साबळे यांनी भाऊच्या धक्क्याचे सुत्रसंचालन केले. भाऊच्या धक्क्यावर यावेळी महाराष्ट्रातली पत्रकार मंडळी जमली होती. यावेळी पत्रकारांनी मंडळींनी स्पर्धकांना प्रेक्षकांच्या मनातली प्रश्न विचारून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. या सेशनमध्ये सुद्धा स्पर्धकांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले. मात्र एपिसोडच्या शेवटी एक आश्चर्यकारक एलिमिनेशन झाले. 

हे ही वाचा : Aishwarya-Abhishek Divorce : ...म्हणून ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाची होतेय तुफान चर्चा, 17 वर्षात बदलल्या 'या' गोष्टी

 बिग बॉसने डॉ. निलेश साबळे व घरात उपस्थित राहिलेले पत्रकार बाहेर आल्यावर संग्रामला कन्फेशन रुममध्ये बोलावून घेतलं. त्यानंतर बिग बॉसने संग्रामला डॉक्टरांनी दिलेली माहिती देत विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला ताबडतोब दारावर लावलेली नावाची पाटी घेऊन घराबाहेर बोलावण्यात आलं. संग्रामने घराचा निरोप घेतल्यावर काही सदस्यांनी त्याच्या आरोग्याबद्दल काळजी देखील व्यक्त केली. मात्र, नेटकऱ्यांना हा निर्णय पटलेला नाही. अरबाजला वाचवण्यासाठी संग्रामला बाहेर काढल्याचे सूर सध्या सोशल मीडियावर उमटले आहेत. 

हे वाचलं का?

दरम्यान या घडामोडीनंतर घरातून बाहेर आल्यानंतर संग्राम चौगुलेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मला झालेल्या काही मेजर इंजरीमुळे मला घरातून जावं लागलं आहे. तुम्ही आजपर्यंत जे प्रेम दिलं ते मी सोबत घेऊन जातोय. आणि तुमच्या सगळ्यांचा प्रेमंच मला लवकर बरं व्हायला मदत करेल, अशी आशा संग्रामने फेसबूक पोस्टवरून व्यक्त केली आहे. 

हे ही वाचा : Gold Rate Today: सोनं घ्या सोनं! पण एकदा भाव तर वाचा, 'या' 15 शहरांना बसला महागाईचा चटका

संग्राम चौगुले यांच्या या पोस्टनंतर काही नेटकरी त्यांना ट्रोल करतायत, तर चाहते त्यांना सपोर्ट देखील करतायत.  त्यामुळे संग्रामच्या पोस्टवर सध्या कमेंटचा भीषण पाऊस पडतोय. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT